डोंबिवली : डोंबिवलीतील अनिल राजपूत, संजय शर्मा, कन्हया विश्‍वकर्मा, संतोष पाल यांच्यासह अनेक रिक्षाचालकांनी "नो हॉर्न डे' मोहिमेला पाठिंबा जाहीर केला.  
मुंबई

पर्यावरण रक्षणासाठी डोंबिवलीकर सरसावले

शर्मिला वाळुंज

ठाणे : डोंबिवलीत "नो हॉर्न डे' पाळण्यात येणार आहे. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून त्याचे पालन करायला आवडेल. डोंबिवलीत रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता दिवसभर हॉर्न न वाजविता वाहतूक करणे थोडे अशक्‍य वाटते; परंतु आम्ही प्रयत्न करू, असे डोंबिवलीतील वाहनचालकांनी म्हटले आहे. "नो हॉर्न डे' या उपक्रमाविषयी बोलताना अनेक दुचाकीस्वारांनी या दिवशी दुचाकीचा वापरच करणार नाही, असे सांगत या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला आहे.

वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांची रुंदी वाढविण्यात आली असली तरी रस्त्याच्या दुतर्फा पार्क होणारी वाहने, फेरीवाले यामुळे ही कोंडी आजही फुटलेली नाही. त्यात डोंबिवली पूर्व व पश्‍चिमेला जोडणारा कोपर पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने ठाकुर्ली उड्डाणपुलावर नियमित कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. या कोंडीत एकदा वाहनचालक अडकला की त्यातून सहजासहजी बाहेर पडणे शक्‍य नसल्याचे माहीत असूनही काही वाहनचालक सातत्याने हॉर्न वाजवीत असतात.

सततच्या हॉर्नच्या आवाजानेही शहरात ध्वनिप्रदूषण होत असून डोंबिवली शहरात येत्या प्रजासत्ताक दिनी पै फ्रेण्ड्‌स वाचनालयाच्या वतीने नो हॉर्न डे उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरात रिक्षा आणि दुचाकीची संख्या जास्त असून या उपक्रमाविषयी रिक्षाचालक व दुचाकीस्वारांशी "सकाळ'ने संपर्क साधला. या वेळी अनेक रिक्षाचालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आम्ही 100 टक्‍के प्रतिसाद देऊ, असे प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

रिक्षाचालक दिनकर पाटील म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम नक्कीच चांगला आहे; परंतु केवळ वाहनचालक याचे उल्लंघन करतात, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण रस्त्याने चालणारे प्रवासी अनेकदा फोनवर गप्पा मारत चालतात, फुटपाथचा वापर न करता रस्त्यावरूनच चालतात. गर्दीच्या वेळेस त्यांना इशारा देण्यासाठी आम्हाला हॉर्नचा वापर करावाच लागतो. परंतु एक दिवस आम्हीही प्रयत्न करून पाहतो, किमान कमीत कमी हॉर्न वाजविण्याचा. 

हा उपक्रम चांगला आहे, त्याची अंमलबजावणी केवळ एक दिवस नाही; तर सातत्याने व्हावी. नागरिकांनीच स्वयंशिस्तीने गरज नसल्यास हॉर्न वाजवू नये किंवा थोडा संयम बाळगूनच वाहन चालविण्यास प्राधान्य दिल्यास ध्वनिप्रदूषण कमी होईल, आमचा या मोहिमेला पाठिंबा राहील. 
- राहुल शेवाळे, दुचाकीस्वार 

पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी प्रजासत्ताक दिनी दुचाकीचा वापरच करायचा नाही हा विचार मी केला आहे. या मोहिमेला माझा पाठिंबा राहील. किमान एक दिवस आपण सर्वांनीच स्वतःशी निश्‍चय करून चांगल्या सवयी अंगी बाळगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 
- धनेश कुलकर्णी, दुचाकीस्वार 

मी स्वतः या मोहिमेत सहभागी होणार आहे, तसेच दुसऱ्यांनाही याविषयी माहिती देऊन जनजागृती करीन. आपल्याला बदल हवा आहे, तर सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी. 
- विघ्नेश जोशी, दुचाकीस्वार 

पै फ्रेण्ड्‌स वाचनालयाच्या वतीने शहरात राबविला जाणारा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. आम्हीही रिक्षाचालकांना याविषयी माहिती देऊन या उपक्रमात सहभागी होऊ. पर्यावरणाच्या दृष्टीने हा उपक्रम चांगला असून त्यासाठी रिक्षाचालकही प्रयत्न करतील. रिक्षाथांब्यावर याविषयी माहिती लावण्यास आम्ही सध्या प्राधान्य देत आहोत. 
- काळू कोमस्कर, अध्यक्ष, लालबावटा रिक्षा चालक-मालक संघटना 


वाहनांची संख्या 
रिक्षा - 12 हजार 298 
दुचाकी - 70 हजार 134 
चारचाकी - 14 हजार 249 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT