मुंबई

मराठा व ओबीसींमध्ये वाद लावू नका; प्रविण दरेकर यांचा इशारा

कृष्ण जोशी

मुंबई ः मराठा समाजाच्या तरुणांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला तर त्याठिकाणी मी त्यांच्याबाजूने उभा राहीन व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती सरकारची जबाबदारी असेल, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे दिला. 

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या आंदोलकांची दरेकर यांनी आज भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीपूर्वीच एसईबीसी गटातून नियुक्त झालेले पण नोकरी न मिळालेले मराठा उमेदवार उपोषणास बसले आहेत. मराठा उमेदवारांना आठ दिवसांत नोकरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र आठ महिन्यांनंतरही ते पूर्ण झाले नसल्याची टीकाही दरेकर यांनी केली.

मराठा मोर्चासाठी मुंबईत निघालेल्या आंदोलकांना नवी मुंबई, नाशिक येथे अडविले जात आहे. परंतु अश्या प्रकारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा तरुणांना रोखणे असंवैधानिक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी या तरुणांना अडविले जाईल त्या ठिकाणी मी विरोधी पक्षनेता म्हणून उपस्थित राहीन. सरकारच्या दडपशाहीमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याची जबाबदारी सरकारची राहील, असेही दरेकर यांनी सुनावले.

महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसी व मराठा समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न होत आहे. या वादाने राज्यात अराजकता माजू शकेल, त्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण त्या समाजाला राहू द्या आणि मराठा समाजाच्या तरुणांची मागणी मान्य  करा अशी मागणीही त्यांनी केली. मराठा समाजाच्या तरुणांनी आतापर्यंत जो संयम दाखवला आहे तो कायम ठेवावा असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीपूर्वीच राज्य सेवेत नियुक्त झालेल्या दोन हजार 185 उमेदवारांची (तलाठी, महावितरण) माहिती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली नाही. ती दिली असती तर वैद्यकीय प्रवेशांप्रमाणे यांनाही सर्वोच्च न्यायालयाने सूट दिली असती. मात्र हे सरकारने केले नाही, त्यामुळे आता तरी सरकारने या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासाठी पावले उचलावीत. तसेच इतर रखडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्याही कराव्यात, असे आवाहनही दरेकर यांनी केले.

Dont argue between Marathas and OBCs Pravin Darekars warning

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT