kitchan 
मुंबई

कम्युनिटी किचनचं राजकारण करालं तर खबरदार...आयुक्तांचा इशारा

सकाळवृत्तसेवा

मिरा रोड : लॉकडाऊनच्या काळात पालिकेतर्फे गरजूंना दिल्या जाणाऱ्या भोजन वाटपाचे फोटो, व्हिडिओ समाजमाध्यमात प्रसारीत करुन काही राजकीय फायदा घेत आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेने शहरातील गरजू नागरिकांना भोजन मिळावे म्हणून चार कम्युनिटी किचन व 34 भोजन केंद्रे सुरू केली आहेत. दरम्यान यामध्ये काहीजण गरजूंना भोजन करतानाचे फोटो, व्हिडिओ समाजमाध्यमात प्रसारीत करत आहेत. त्यामुळे अनावश्यक गर्दी होत असल्याचे लक्षात आल्याने कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिला आहे. 

दरम्यान भोजन वितरण केंद्रावर कोणत्याही संस्था तसेच राजकीय पक्षांनी आपली बॅनरबाजी करू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच भोजन वाटपाचे फोटो अथवा व्हिडिओ टाकल्यास भारतीय दंडविधान 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.

पेणकरपाडा मराठी शाळा क्रमांक 14 याठिकाणी गरजूंना भोजन दिले जात आहे. प्रभागातील नगरसेविका अनिता पाटील यांच्या कार्यकर्त्यांमार्फत मात्र लोकांची दिशाभूल करत भोजन नगरसेविका पाटील यांच्यामार्फत दिले जात असल्याचे सांगितले जाते, अशी तक्रार नगरसेवक परशुराम म्हात्रे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे तसेच प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका पाटील आपल्या मर्जीतील लोकांना भोजन देत असून याप्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

don't use community kitchen for publicity read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT