मुंबई

"कुणीही उपाशी झोपणार नाही", काय आहे 'पोलिस आपल्या दारी' हा उपक्रम

सकाळवृत्तसेवा

कल्याण - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन सुरू असून या काळात घराच्या बाहेर पडू नका ,अश्या सूचना दिल्या जात असून गरीब आणि गरजू नागरिकांच्या मदतीला कल्याण वाहतूक शाखा पोलिस धावून आले आहेत. कल्याण वाहतूक पोलिसांकडून 'पोलिस आपल्या दारी' हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आलाय. या अंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना अन्न आणि अन्न धान्य मोफत वाटप केले जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसाच्या लॉकडाऊन काळात नागरिकांनी घराच्या बाहेर पडल्यास तोंडाला मास लावा, दोन माणसामध्ये अंतर ठेवा अश्या सूचना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित केंद्र आणि राज्य शासन करत आहे . यात गरीब आणि गरजू नागरिकाना उपास मारीची वेळ आली आहे. याधर्तीवर कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी वाहतूक पोलीस आपल्या दारी अभिनव उपक्रम सूरु केला आहे. बाहेर पडू नका मात्र आपण उपाशी झोपणार नाही असे आश्वासन गरीब नागरिकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिले आहे .

वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील व त्यांचे मित्र परिवार, कल्याण वाहतुक शाखेचे कर्मचारी, रोटरी डे यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबविला जात असून प्रति दिन कल्याण रेल्वे स्टेशन परिसर मध्ये 600 ते 700 गरीब आणि गरजूना जेवणाचे डब्बे मोफत दिले जात आहेत. आज बुधवार ता 1 एप्रिल रोजी सकाळी कल्याण मधील मोहने परिसर मधील जेतवन नगरमध्ये कातकरी पाडा आदिवासी वस्तीमध्ये वाहतूक विभाग सहायक आयुक्त दत्तात्रय निघोट , पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील , त्यांचे पथक आणि रोटरी डेच्या पदाधिकारीनी 155 कुटुंबाना अन्न धान्य मोफत वाटप केले. यात पीठ , तांदूळ , साखर , तूरडाळ , मीठ , तेल , चहा पावडर , कांदा , बटाटे , लोणचे आणि पाणी बॉटल आदींचा समावेश होता .

नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नका, नियमांचे पालन करा, स्वच्छता ठेवा, कोणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी वाहतूक पोलीस घेत असल्याची माहिती यावेळी वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिली .

dont worry no one will sleep hungry unique initiative by kalyat traffic police in corona crisis 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याची घौडदौड सुरूच! भावात सलग पाचव्या दिवशी वाढ, चांदीही महागली; तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा भाव? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी पहिल्या ३० उमदेवारांची यादी काँग्रेसकडून आज प्रसिद्ध होण्याची शक्यता

Gujarat Earthquake Today : पहाटे गुजरात हादरलं; कच्छ भागात भूकंपाचे धक्के, भूकंपशास्त्र विभागाची माहिती

कोणाचा काडीमोड, तर कोणाचं लग्न तुटलं, 2025 मध्ये 'या' सेलिब्रेटींच्या नात्याता आली मोठी दरी

Prakash Ambedkar: हिंदू मतदारांनी काँग्रेस पक्षाला सोडलंय: ॲड. प्रकाश आंबेडकर, भाजप सोडून युती करण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT