मुंबई

राजगृहाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त, संशयित ताब्यात

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर मंगळवारी रात्री दोन अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंबेडकरी अनुयायांकडून निदर्शने होण्याची शक्यता असल्यानं मोठा पोलिस फाटा तैनात केला आहे. तसंच या तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी करवाई केली आहे. पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती संयुक्त पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या या परिसरात तीन वायरलेस आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

हल्लेखोरांनी घराच्या काचांवर दगडफेक करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली आहे. कुंड्यांचं सुद्धा मोठं नुकसान करण्यात आलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे या निवासस्थानाला विशेष महत्त्वं आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचं ठिकाण आहे.

या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे राजगृहाबाहेर आंबेडकरी अनुयायांनी गर्दी करू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजगृहाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच राजगृह परिसरात येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचाः 'राजगृह' तोडफोड प्रकरणः राष्ट्रवादीकडून निषेध, आक्रमक पवित्रा घेत केली 'ही' मागणी

राजगृहाकडे येणाऱ्या रस्त्यांवरही पोलिस तैनात आहेत. या परिसरातल्या वाहनांचीही तपासणी केली जातेय. पोलिसांनी राजगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवलं असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

  • मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत. राजगृह ही वास्तू हे केवळ आंबेडकरी जनतेची नव्हे तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचाः हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' भागात डोअर-टू-डोअर स्क्रिनिंग 'फेल'

आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment : पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी आजपासून; एकूण ४६२ जागा

Jewellery Shop Robbery : 'त्या' विसरलेल्या मोबाईलमुळे झाला दरोड्याचा उलगडा; राजस्थानमधील पाच दरोडेखोर अलगद जाळ्यात, बंगळुरातील सराफी दुकानातील घटना

Valentine's Day Trip: निसर्गप्रेमी जोडप्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन! पुण्याजवळच्या ‘या’ ठिकाणी साजरा करा व्हॅलेंटाईन डे

Inspirational Story: दगड रचणाऱ्या वडिलांचे स्वप्न झालं सोनं! संकेत मोहितेला जपानमध्ये २० लाखांचे पॅकेज, मेहनतीच्या जाेरावर कंपनीत नाेकरी!

P Velarasu : औद्योगिक विकासासाठी १० हजार एकरांचे संपादन करणार

SCROLL FOR NEXT