Cocaine Drug sakal
मुंबई

DRI ची धडक कारवाई, मुंबई विमानतळावर सापडले 7 कोटींचे कोकेन

याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मुंबई - अंमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) ताब्यात घेतलेल्या ३८ वर्षीय परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेन भरलेल्या ७० कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. या कोकेनची किंमत तब्बल सात कोटी रुपये आहे. याप्रकरणी या संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून ब्रँडन सुल्पिसिअस मिगाडे (वय ३८) असे या परदेशी नागरिकाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, डीआरआयने रचलेल्या सापळ्यात एक परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या पोटातून कोकेन भरलेल्या ७० कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. हा आरोपी मूळचा युगांडा देशाचा नागरिक असून त्याला १३ मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. तो इथोपियावरून मुंबईत आला होता. त्याच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार जे.जे. रुग्णालयात त्याचा एक्सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात संशयीत कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते.

दरम्यान, यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून या ७० कॅप्सूल बाहेर काढल्या आहेत. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन ६९० ग्रॅम असून त्याची किंमत सुमारे सात कोटी रुपये आहे. घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्याने हे काम करण्यास होकार दिला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी त्याला सोमवारी डीआरआयने अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांबाबत डीआरआय अधिक तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT