कामगारांचे आरोग्य धोक्‍यात  
मुंबई

बेस्ट कामगारांचे आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः बेस्ट उपक्रमावरील आर्थिक संकटामुळे कामगारांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. ताणतणावामुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षात १६५ कामगारांचे निधन झाले; तर २०१९-२० मध्ये आतापर्यंत २३० कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्याचे पडसाद नुकत्याच झालेल्या बेस्ट समितीत उमटले. कामगारांच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनावर ठपका ठेवत ५० वर्षांत पहिल्यांदाच बेस्ट समितीची सभा तहकूब करण्यात आली.

बेस्ट उपक्रमाच्या दिंडोशी आगाराचे बसचालक बाबारामू आलदर यांना कामावर असतानाच हृदयविकाराचा झटका आला; परंतु व्यवस्थापनाने त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात न नेता आगारापासून दूर असलेल्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ बेस्ट समितीचे काँग्रेस सदस्य भूषण पाटील यांनी झटपट तहकुबी सूचना मांडली. बेस्टवरील आर्थिक संकट आणि प्रशासनाच्या धोरणांचा कामगारांच्या जीवनावर अनिष्ट परिणाम होत आहे, असे ते म्हणाले. 

करारावर सही न केल्यामुळे ५० टक्के कामगारांना वाढीव पगार मिळालेला नाही. दरवर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागांवर नवीन भरती केलेली नाही. ग्रॅच्युईटीची रक्कम मिळण्याची शक्‍यता नाही. २०१९ मधील जाचक ‘ड्यूटी शेड्युल’ बदललेले नाही. त्यामुळे अनेकांना हृदयविकाराचा त्रास होत आहे. असा प्रसंग ओढवल्यास संबंधिताला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याऐवजी, उपचाराचे पैसे कोण देणार, असा जाब प्रशासन विचारेल या भीतीने महापालिका किंवा सरकारी रुग्णालयात दाखल केले जाते, असे पाटील यांनी निदर्शनाला आणून दिले. तर, बेस्ट उपक्रमाचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी कामगारांचे आजार, मृत्यू आदी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT