Kranti Redkar Teame Sakal
मुंबई

मेहुणीविरोधात ड्रग्ज केस, समीर वानखेडेंनी दिलं उत्तर

"२०१७ साली माझे क्रांतीशी लग्न झाले आहे. मग २००८ च्या प्रकरणाशी माझा काय संबंध?"

सुरज सावंत

मुंबई: NCB मुंबईचे झोनल संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) दररोज वेगवेगळे आरोप करत आहेत. आज नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा वानखेडेंवर व्यक्तीगत हल्लाबोल केला आहे.

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरच्या बहिणीवरुन नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. "समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का?" असा नवाब मलिक यांनी सवाल केला आहे. समीर वानखेडे यांना उत्तर देण्याचं मलिकांनी आव्हान दिलं आहे.

'तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या' असे ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे. हा घ्या त्याचा पुरावा असं म्हणत ई कोर्ट सर्व्हिसेसवरील काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. आता यावर समीर वानखेडेंनी आपली बाजू मांडली आहे.

"क्रांती रेडकरच्या बहिणीवर जानेवारी २००८ मध्ये गुन्हा दाखल झाला असेल. मी सप्टेंबर २००८ मध्ये IRS झालोय. २०१७ साली माझे क्रांतीशी लग्न झाले आहे. मग २००८ च्या प्रकरणाशी माझा काय संबंध?"असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT