Drugs 
मुंबई

डोंबिवलीत घरातच सुरू होता ड्रग्सचा कारखाना; NCBने केली कारवाई

डोंबिवलीतील पलावा सिटीतील घटना; दोघांना अटक

विराज भागवत

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा गेल्या वर्षी संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचं ड्रग्स कनेक्शन हा चर्चेचा विषय ठरला. बॉलिवूडला ड्रग्सची कीड लागल्याचे आरोप अभिनेत्री कंगना रानौत हिने केले. याच मुद्द्यावरून आजकालच्या तरूण पिढीत ड्रग्स सेवनाचे प्रमाण वाढल्याबाबतच्या चर्चाही रंगल्या होत्या. तशातच आज मुंबईतील डोंबिवली परिसरात घरातच सुरू असलेला ड्रग्सचा एक कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. हायटेक ड्रग्स बनवणारा कारखाना NCB कडून उद्ध्वस्त करण्यात आला. डोंबिवलीच्या पलावा सिटीत ही कारवाई करण्यात आली. घरामध्येच हायड्रोफोनिक वीड (गांजा) बनवणारी टोळी NCBकडून जेरबंद करण्यात आली. या कारवाई दरम्यान १ किलो हायड्रोफोनिक वीड जप्त करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली.

काही लोक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्सईड आणि इतर घटक वापरून घरात ड्रग्स तयार करत आहेत आणि त्याची शेती करत आहेत, अशी माहिती NCB ला मिळाली होती. सुरुवातीला NCBच्या अधिकाऱ्यांनी वर्सोवा परिसरात छापा टाकला. त्या छाप्यात दोघांना अटक करण्यात आली. या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे NCB चे अधिकारी डोंबिवलीच्या फॅक्टरीमध्ये गेले. तेथे घरातच पाण्यामध्ये कॅनबीची शेती केली जात होती, असं उघडकीस आलं. मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या दोघांमध्ये एका नायजेरियन नागरिकाचाही समावेश आहे.

ज्या ड्रग्सची लागवड केली जात होती, तो ड्रग्स कोणीही असंच खरेदी करू शकत नाही. या ड्रग्सचे सीड्स अमेरिकेवरून आणले जात होते. डार्क वेबवर या एका सीड्सची किंमत सुमारे १५ डॉलर्स इतकी आहे असं सांगितलं जात आहे. तसंच काळ्या बाजारात अंदाजे १५ हजाराला हे सीड्स मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. NCBने हे सर्व साहित्य ताब्यात घेतलं असून आणखी कुठे अशा पद्धतीने कारखाना चालवला जातोय का याचा तपास NCBकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

Salman Agha Runout: आधी रनआऊट झाला अन् मग हेल्मेट फेकलं... पाकिस्तानच्या सलमान आघावर ICC ची कारवाई

Maharashtra State Cooperative Bank : राज्य बँक ठरली यूपीआय स्वीकारणारी देशातील पहिली शिखर बँक

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

SCROLL FOR NEXT