मुंबई

स्वतःची चिता रचून त्यावर 'तो' झोपला देखील, लोकांनी काढले व्हिडीओ...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - आपल्या आसपास अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. आपण आपला बराचसा वेळ सोशल मीडियावर घालवत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर हरप्रकारची माहिती समोर येत असते. यातील काही व्हिडीओ पाहिलेत की मन सुन्न होतं. केवळ सोशल मीडियाचं नव्हे तर आपल्या आसपास शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला येत जात असताना देखील आपल्या आसपास अनेक गोष्टी घडत असतात. या गोष्टींचं आपल्यावर परिणाम होत असतो.

गेल्या काही काळात अशा अनेक घटना आपण बातम्यांमधून पाहिल्यात ज्यामध्ये एखाद्या ट्र्कचा अपघात झाला तरीही लोकं त्यातल्या माणसांना वाचवण्यापेक्षा त्या ट्रकमधील सामान चोरण्यात मग्न असतात. कुठे काही मारहाण होत असेल तर अनेकदा लोकं वाचवायचं सोडून त्याचा व्हिडीओ काढण्यात जास्त रुची ठेवतात.

असाच एक धक्कादायक प्रकार पुहा एकदा समोर आलाय. या धक्कादायक प्रकारादरम्यान एका इसमाने स्वतःची चिता रचत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय. आसपासच्या लोकांनी त्याला तसं करण्यापासून परावृत्त करण्यापेक्षा व्हिडीओ काढण्यात धन्यता मानलीय.   

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर इसम हा दारूच्या नशेत धुंद होता. दारूच्या नशेतच त्याने स्वतःची चिता रचली. चिता रचल्यानंतर हा इसम स्वतः या चितेवर झोपला देखील. धक्कादायक बाब म्हणजे अनेकांनी या इसमाचा व्हिडीओ तर रेकॉर्ड केला मात्र त्याच्या मदतीला कुणी गेलं नाही. थोड्या वेळाने हा इसम जळतोय पाहिल्यानंतर काही लोकांनी त्याला दवाखान्यात दाखल केलं. मात्र या इसमाला गंभीर इजा झाली आणि सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

व्हिडीओ मध्ये काय दिसतंय ?  

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झालाय. हे फोटो देशभरात पोहोचलेत. यामध्ये साधारण साडेतीन ते चार फूट फुटांची चिता रचल्याचं दिसतंय. खालुन या चितेला आग लावण्यात आली आहे. या आग लावलेल्या चितेवर हा इसम झोपताना पाहायला मिळतोय. याठिकाणी अनेक लोक नजरेस पडतायत.

दरम्यान हे फोटो आणि व्हिडीओ धक्कादायक असल्याने ते आम्ही शेअर करू शकत नाही. मात्र तुमच्या समोर असे काही प्रकार घडत असल्यास व्हिडीओ काढण्या ऐवजी लोकांना मदत करा. सदर घटना लखनऊ मधील असल्याचं बोललं जातंय. 

drunken man torched himself and people recorded videos instead of helping him

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : भाजप नेते मोहित कंबोज यांचा गणपती विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर

India's All-Time T20I XI : रोहित, विराट, सूर्या संघात; कर्णधार मात्र वेगळाच, आशिया चषकापूर्वी पाहा भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ

Latest Maharashtra News Updates : गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन

Ganpati Visarjan 2025 : उमरग्यात शाळकरी मुलांनी पारंपारिक वाद्यांच्या तालावर गणरायाला दिला निरोप

SCROLL FOR NEXT