मुंबई

Dry Run: कल्याण डोंबिवलीत कोरोनाच्या लसीकरणबाबतच ड्राय रन यशस्वी

शर्मिला वाळुंज

मुंबईः सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्यावतीने कोविड 19 लसीकरणबाबत ड्राय रन मोहीम यशस्वी पार पडली. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी नागरी आरोग्य केंद्र आणि डोंबिवली पूर्वेतील पाटकर नागरी आरोग्य केंद्रात कोविड साथीच्या लसीकरणाबाबत यशस्वी ड्राय रन घेण्यात आला. लसीकरणाची पूर्व तयारी म्हणून हा ड्राय रन घेण्यात आला.

कल्याण आणि डोंबिवलीतील प्रत्येकी 20 लाभार्थी निश्चित करुन त्यांना ड्राय रनसाठी आधी संदेश पाठविण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी नागरी आरोग्य केंद्रावर हे लाभार्थी आल्यानंतर त्यांना शिस्तबद्ध पद्धतीनेच लस दिली गेली. लसीकरण ठिकाणी प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरिक्षण कक्ष उभारण्यात आले होते. त्यानुसार डॉक्टरांच्या निगराणीखाली ही लस आज देण्यात आली.

पहिल्या टप्‍प्यात सरकारी आणि खाजगी आरोग्य अधिकारी/कर्मचारी, दुस-या टप्प्यात पोलिस - सुरक्षा कर्मचारी, सरकारी कर्मचारी तिस-या टप्‍प्यात वयोवृध्द आणि व्याधीग्रस्त आणि इतर लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर टप्‍प्याटप्‍प्याने रोज 100 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिली. 

कल्याणमधील ड्राय रन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील तसेच कोळसेवाडी नागरी आरोग्य केंद्राच्या स्त्री वैदयकीय अधिकारी डॉ. वैशाली काशीकर यांच्या प्रमुख‍ उपस्थितीत घेण्यात आला. तर डोंबिवलीतील ड्राय रन उप आयुक्त सुधाकर जगताप, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील आणि डॉ. समिर सरवणकर आणि मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांच्या देखरेखीखाली घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) डॉ. किशोर चव्हाण यांनी डोंबिवलीतील पाटकर नागरी आरोग्य केंद्राला भेट देऊन ड्राय रनचा आढावा घेतला.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Dry run successful corona vaccination Kalyan Dombivali

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT