मुंबई

वातावरण बदलल्याने सर्दी, ताप, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढली; यावर डॉक्टर म्हणतात...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सध्या मेडिकल स्टोअर्समधून सर्दी , ताप , खोकला आणि घसा दुखीच्या औषधांना मागणी वाढली आहे.  त्यामुळे अनेक औषधे आणि सिरप्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. गोळ्या-औषधांचा रेकॉर्ड ठेवणे अनिवार्य असल्याने कागदोपत्री रेकॉर्ड ठेवला जातो प्रत्यक्षात मात्र औषधांचा पुरवठा कमी झाला असल्याचे ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे या रेकॉर्डची तपासणी करण्याची गरज असल्याची मागणी ही करण्यात आली आहे .

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांमध्ये काहीशी भीती निर्माण झाली आहे. त्यातच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने सध्या सर्दी , खोकला , घशात खवखव आणि तापाच्या रुग्णांमध्ये काहीशी वाढ झाली आहे.  त्यामुळे सर्दी, खोकला, तापाची लक्षणे जाणवताच लोकांनी काळजी म्हणून मेडिकल मधून औषधे घेण्यास सुरुवात केली आहे. 

डोकेदुखी, खोकला, अंगदुखी, शिंका, घशाची खवखव असे त्रास एरव्ही अनेकांना होत असतात. अशा रुग्णांना गरजेनुसार डॉक्टर ही औषधे देत असतात. सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसली तरी त्याचा संबंध कोरोनाशी असेलच असे नाही. पण, सध्या कोरोना संसर्गाचा प्रकोप पाहता सर्व नागरिक ही औषधे खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे सध्या खोकल्याची, अँझिथ्रोमाईसीन, पॅरासीटँमोल अशा औषधांची मागणी वाढली आहे.

महापालिका रुग्णालयात मात्र तुटवडा नाही :

सध्या तरी महापालिकेच्या रुग्णालयामध्ये कोणत्याही औषधांचा तुटवडा नाही. त्यामुळे नागरिकांनी ओपीडीमध्ये औषधे घ्यावीत. सर्दी, खोकला, ताप असेल तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. घरी औषधे घेऊ नयेत. पाणी उकळून प्यावे. पावसात भिजणे पाण्यात जास्त वेळ उभे राहणे टाळावे. -  डॉ. रमेश भारमल, संचालक, पालिका मुख्य रुग्णालये.

अनेकदा डॉक्टराच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकत घेतली जातात. पावसामुळे या औषधांना अचानक मागणी वाढली असून केमिस्ट चालक ही अतिरिक्त मालाची मागणी करत आहेत. ज्या केमिस्टमध्ये औषधांची कमतरता आहे ते केमिस्ट चालक मागणीनुसार दोन ते तीन दिवसात औषध उपलब्ध करून देत असल्याचे ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डरचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.

कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय केमिस्टमधून औषध विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. बहुतेक दुकानदार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही औषध देतात. त्यामुळे कागदोपत्री या औषधांचा तुटवडा जाणवत नाही. प्रत्यक्षात मात्र काही दुकानांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याचे ही पांडे यांनी सांगितले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे चुकीचे असल्याचे ही ते म्हणाले.

सर्दी, खोकला, तापाच्या औषधांची मागणी वाढली आहे. त्यामुळे 30 ते 40 टक्के औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच  गोळ्यांचा रेकॉर्ड ठेवायला सांगितला जात असल्याने ऑन पेपर  तुटवडा दिसून येत नाही - अभय पांडे, अध्यक्ष ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर. 

due to change in atmosphere demand in cold and flu tablets increased

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणात सहा संचालकांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT