मुंबई

मोठी बातमी - ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्रातील ४ मोठी शहरं राहणार बंद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाशी लढण्यासाठी, राज्यात कोरोनाचा वाढत संसर्ग कमी करण्यासाठी, खबरदारीचा उपाय म्हणून काही अत्यंत कठोर निर्णय घेणं गरजेच असल्याचं सर्वच स्तरातून बोललं जातंय. स्वतः महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील ट्रेन आणि बसेसमधील गर्दी कमी करण्यासाठी ना विलाजास्तव कठोर निर्णय घयायला लागेल असं यांनी सांगितलंय. अशात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. 

महाराष्ट्रात सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांना चांगला प्रतिसाद मिळतोय, नक्कीच मिळतोय. मुंबईतील गर्दीत फरक पडला आहे. तरीही पुढील पंधरा दिवस अत्यंत काळजीची घेण्याची गरज आहे, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. दरम्यान, ज्या कारणांमुळे मुंबईतील ट्रेन आणि बसेसमधील गर्दी होतेय ती कारणं मुंबईतही ऑफिसेस आहे. म्हणूनच अत्यंत नाईलाजाने महाराष्ट्रातील सर्व ऑफिसेस आता बंद राहणार आहेत. तसा निर्णय सरकारने घेतलाय. 

मुंबई महानगर परिसर,  पुणे,  पिंपरी चिंचवड आणि नागपूरमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता बाकी सर्व आता बंद करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेत. जगण्यासाठी घरात राहणं गरजेचं असल्याने महाराष्ट्र सरकारकडून हा कठोर निर्णय घेण्यात आलाय, असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेत.

ट्रेमध्ये आणि रेल्वेमध्ये गर्दी होते मात्र त्या मुंबईच्या वाहिन्या आहेत त्या बंद करणं करणं सोपं आहे. मात्र त्यामुळे अत्यावश्यक सेवा देखील कोलमडण्याची शक्यता आहे. म्हनुनच तूर्तास तरी ट्रेन आणि बसेस बंद न करण्याचा निर्णय घेतला.  

आता संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरी थांबण्याची गरज आहे. अशात कोरोनाशी लढण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती समोर येतायत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानलेत. महाराष्ट्र सरकारकडून एक फिल्म रिलीज केली गेलीये. रोहित शेट्टी यांनी ही फिल्म बनवली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. CM ऑफिसमधून ही फिल्म रिलीज करण्यात आली आहे. 

due to corona virus everything apart from emergency services will remain close CM Uddhav Thackeray 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Maharashtra Day 2024: मराठी गिरा दिसो...!

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

SCROLL FOR NEXT