बदलापूर ः घरातच लग्नाचे विधी पार पाडताना जोडपे. 
मुंबई

ना बॅंड, ना बाजा, ना बारात...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः सनई चौघडे, प्रशस्त लॉन, कपडे, दागिन्यांची खरेदी, एक ना अनेक जबरदस्त प्लॅन... इतकेच नाही, तर पत्रिकाही छापून झाल्या. ही सर्व लगीनघाई सुरू असतानाच अचानक कोरोनाच्या थैमानामुळे लग्नसोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले आणि लग्न पुढे ढकलण्याचा विचार नातेवाईकांनी सुरू केला; मात्र, याला विरोध करत नवरा मुलगा आणि नवरी मुलीने सर्व धार्मिक विधी घरीच उरकून समजूतदारपणा दाखवत नवीन आयुष्याला सुरुवात केली. इतरांप्रमाणे लग्न पुढे न ढकलता लग्नाच्या अवाजवी खर्चाला फाटा देत समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचे बदलापुरातील नवविवाहित जोडप्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

जितेश आणि मिताली हे दोघेही बदलापुरातील बेलवली गावात राहतात. एप्रिलमध्ये त्यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात होणार होता. कराळे आणि गोसावी दोन्ही कुटुंबातील मंडळी लग्नाच्या तयारीत मग्न होते; परंतु कोरोनाचा वाढता प्रसार पाहता हा नियोजित सोहळा पुढे ढकलावा, असे नातेवाईकांनी सुचवले; मात्र यास नकार देत दोघांनीही नवरी मुलीच्या घरी साखरपुडा व इतर धार्मिक विधी उरकून लग्नगाठ बांधली. गर्दी टाळण्यासाठी या लग्नात दोन्ही कुटुंबातील प्रत्येकी चार व्यक्ती हजर होत्या. 

आमच्या आगरी समाजातील अनेकांनी नियोजित लग्न पुढे ढकलली; मात्र समाजात लग्न सोहळ्यावर केला जाणारा खर्च टाळून समाजात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व नियम पाळून लग्न केले. लग्नाची सर्व तयारी झाली होती; मात्र आम्ही दोघांनी कुटुंबीयांची समजूत काढून घरातच साधेपणाने लग्न केले. 
जितेश कराळे, बदलापूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT