...झाले असे काही की, मुंबईकर पुरते पाण्यात!  
मुंबई

...झालं असं काही की, मुंबईकर पुरते पाण्यात!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनमुळे शहरातील उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे त्यांना दररोज पुरवले जाणारे 588 दशलक्ष लिटर पाणी आता निवासी भागात वळवले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चांगलीच चंगळ सुरू आहे. 

मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. त्यापैकी 15 टक्के पाणी उद्योग, व्यवसाय, मॉल, हॉटेलांना पुरवले जाते. उद्योग-व्यवसाय बंद असल्याने त्यांना पुरवले जाणारे 588 दशलक्ष पाणी आता निवासी भागाकडे वळवले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने स्वच्छतेसाठी पाण्याची मागणी वाढली आहे. आता अतिरिक्त पाणी मिळू लागल्यामुळे मुंबईकरांची चंगळ सुरू आहे.  तुळशी, विहार, तानसा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, भातसा, मध्य वैतरणा आदी धरणांतून मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सव्वा कोटी लोकसंख्या आणि उद्योग-व्यवसायांना हे पाणी पुरवले जाते. 

मुंबईत पुरेसे पाणी असूनही, वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टी भागांत अजूनही पाणीटंचाईची समस्या भेडसावत असते. अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. ही समस्या सोडवण्यासाठी पाण्याचा साठा करण्याची गरज लक्षात घेऊन उपकरप्राप्त इमारतींमध्ये टाक्‍या बांधण्यात येणार आहेत. जुन्या इमारतींच्या मक्ताधारकांकडून महापालिकेकडे मागणी झाल्यास "ना हरकत' प्रमाणपत्र देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT