मुंबई

कचरा टाकण्यासाठी गेलेला डंपर 100 फुट खाली कोसळून चालकाचा मृत्यू; संबधित कंपनीवर गुन्हा दाखल

विक्रम गायकवाड

पनवेल : पनवेल मधील ओवळे गाव येथील डंम्पीग ग्राऊंडवर रात्रीच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी गेलेल्या डंपर चालकाला अंधारात अंदाज न आल्याने त्याच्या ताब्यातील  डंपर 100 फूट खोल खड्डयात जाऊन पडल्याची व या अपघातात डंपर चालकाचा दुर्दैवी  मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सदर डंपिंग ग्राऊंडवर रात्रीच्यावेळी काम करण्याची परवानगी नसताना देखील आयजीबी कंपनी व राधाकृष्ण कंन्स्ट्रक्शन कंपनीने योग्य ती खबरदारी न घेता निष्काळजीपणे काम चालु ठेवल्यामुळे सदरचा अपघात घडल्याचे आढळुन आले. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार धरुन आयजीबी कंपनी व राधाकृष्ण कंपनीच्या संबधीत ठेकेदार व सुपरवायजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

या अपघातात मृत पावलेल्या डंपर चालकाचे नाव मोहम्मद अन्वर हुसेन (25) असे असून गत 24 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास पनवेलमधील ओवळे गाव येथील डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी गेला होता. मात्र, सदर डंपिग ग्राऊंडवर विद्युत प्रकाश नसल्याने डंपर चालक मोहम्मद हुसेन याला अंधारात अंदाज न आल्याने त्याच्या ताब्यातील डंपर डंपिग ग्राऊंडवरुन 100 फुट खोल खाली कोसळला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी व ग्रामस्थांनी मोबाईल फोनच्या प्रकाशात शोध घेतला असता, कचऱयाचा डंपर 100 फुट खाली पडल्याचे व तेथील दगडामध्ये डंपर चालक जखमी अवस्थेत पडल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. 

या घटनेनंतर पोलिसांनी डंपिंग ग्राऊंडवर उपस्थित असलेल्या सुपरवाझर दिनेश माया सिंग व मॅनेजर जी.के.कुलकर्णी यांच्याकडे डंपींग ग्राऊंडवर रात्रीच्या वेळेस काम करण्याची परवानगी आहे का? याबाबत विचारणा केली असता, त्या दोघांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारची कागदपत्रे देखील सादर केली नाहीत. यावरुन सदर डंपिंग ग्राऊंडवर रात्रीच्यावेळी काम करण्याची परवानगी नसताना देखील आय.जी.बी.कंपनी व राधाकृष्ण कंन्स्ट्रक्शन कंपनीने योग्य ती खबरदारी न घेता निष्काळजीपणे काम चालु ठेवले. तसेच त्याठिकाणी विद्युत प्रकाशाची सुविधा उपलब्ध केली नाही, त्यामुळेच डंपर चालकाला अंधारात अंदाज न आल्याने त्याचा डंपर 100 फुट खाली कोसळून त्यात डंपर चालकाचा मृत्यू झाल्याचे आढळुन आले. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताला आयजीबी कंपनी व राधाकृष्ण कंपनीच्या संबधीत ठेकेदार व सुपरवायझरला जबाबदार धरुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Dumper dumper crashes 100 feet down drive die File a case against the company concerned

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT