cylindar 
मुंबई

बनवाबनवी ! लॉकडाऊन मोडत गॅस वितरकाचा ड्रेस घालून तरुण निघाले गावी, मग पोलिसांनी पकडलं अन्

सकाळवृत्तसेवा

उल्हासनगर : गॅस वितरण हे अतिआवश्यक सेवेत मोडत असल्याने आपल्याला कुणी थांबवणार नाही, हा विचार करून ठाण्यातील तिघांनी परिवारासह गॅस वितरण कंपनीचा ड्रेस घालून गॅस सिलेंडरच्याच गाडीतून नांदेडला जाण्याची शक्कल उल्हासनगर पोलिसांमुळे फसली. 

ठाणे येथील मानपाडा जवळील चितळसर या ठिकाणी राहणाऱ्या एकाच परिवारातील महिला, पुरुष, व लहान मुल असे 15 ते 20 जण लॉकडाऊन वाढल्याने व अन्नधान्याच्या कमतरतेमुळे आपल्या गांवी नांदेड येथे जाण्याची तयारी केली. त्यातील तिघे जण हे गॅस वितरण करण्याचे काम करत होते. पोलिसांनी आपल्याला अडवू नये यासाठी तिघांनी “नामी शक्कल” लढवत अत्यावश्यक सेवा असणाऱ्या घरगुती गॅस वितरणाचा ड्रेस घातला आणि गॅसच्या सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या अँपे रिक्षाच्या बनवलेल्या कॅबिनमध्ये परिवाराला बसवून नांदेड येथे निघाले. 

ठाण्यावरून सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास निघाल्यावर गॅस वितरणाची गाडी बघून त्यांना कोणत्याही चेकपोस्टवर पोलिसांनी चेक करण्यासाठी थांबवले नाही. पण ही गाडी सकाळी 6 वाजता उल्हासनगरात शहाड ब्रिज वरून खाली उतरत असताना उल्हासनगर पोलिसांना गाडी चालक व सिलेंडर गाडीवर संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवून तपासणी केली. यावेळी त्यांनी ठाण्यावरुन आलो आहोत व गावी नांदेड जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना समज देऊन पुन्हा माघारी ठाण्याला पाठवले.

During lockdown, youngstars wearing a gas dispenser dress for going their hometown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT