शीतल गंभीर देसाई sakal
मुंबई

'सदा'नकदा विरोधी राजकारण नको; शीतल गंभीर देसाई यांचा आमदारांना टोला

गंभीर व्यक्तीसारखे वागण्याचा सल्ला; प्रसूतीगृह नावावरून आमदार नगरसेविका वाद

कृष्ण जोशी - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माहीमच्या शिवसेना आमदारांनी 'सदा'नकदा विरोधाचे राजकारण करू नये तर गंभीर व्यक्तीचा आदर्श घेऊन थोर व्यक्तीसारखे वागावे. अन्यथा निवडणुकीत पराभूत होऊन वणवण करणे नशिबी येईल, असा टोला भाजपच्या मुंबई महिला आघाडी प्रमुख नगरसेविका शीतल गंभीर देसाई यांनी लगावला आहे.

माहीमच्या प्रसूतीगृहाच्या नामकरणावरून शिवसेना आमदार सदा सरवणकर व भाजप नगरसेविका शीतल गंभीर देसाई यांच्यात वाद सुरु झाला आहे. माजी नगरसेविका स्व. इंदुमती माणगावकर यांचे नाव प्रसूतीगृहाला द्यावे असा आमदारांचा प्रस्ताव आहे. तर स्व. सिंधुताई सकपाळ यांचे नाव प्रसूतीगृहाला देण्याची मागणी श्रीमती देसाई यांनी नंतर केली आहे. या विरोधाचे गंभीर परिणाम श्रीमती गंभीर देसाई यांना निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशारा सरवणकर यांनी दिला आहे. तर सदानकदा सत्तेसाठीच विरोधी राजकारण केल्यास निवडणुकीत पराभव होऊन वणवण करणे नशिबी येईल. त्यामुळे आमदारांनी आहे त्यात समाधान मानावे, असेही श्रीमती देसाई यांनी सुनावले आहे.

सरवणकर यांनी श्रीमती देसाई यांच्यावर, नीच प्रवृत्तीचे राजकारण, लज्जास्पद राजकारण, विकृती, अशा शब्दांत टीका केली आहे. मात्र श्रीमती देसाई यांनी संयमी भाषेतच या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. प्रसूतीगृहाला सिंधुताईंचे नाव देण्याचा प्रस्ताव आपण आताच का दिला, असे विचारले जात आहे. मात्र महापालिकेच्या नियमांनुसार सर्वसाधारणपणे दिवंगत व्यक्तींच्या स्मृती कायम रहाव्यात यासाठी दिवंगत व्यक्तींचीच नावे रस्ते, चौक आदींना दिली जातात याची माहिती आमदारांना असायला हवी. त्याचमुळे आपण सिंधुताईंचे नाव देण्याचा प्रस्ताव आता दिला आहे, असेही श्रीमती देसाई यांनी दाखवून दिले आहे.

सिंधुताईंचे नाव प्रसूतीगृहाला देण्याची मागणी हे कोणाला हीन राजकारण, लज्जास्पद राजकारण, नीच प्रवृत्तीचे राजकारण, आकस किंवा विकृती वाटत असेल तर अशा मनोवृत्तीपुढे आपण काहीच करू शकत नाही. त्यांना फक्त, लौकर बरे व्हा, अशा शुभेच्छाच आपण देऊ शकतो. मी पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले आहे, पदासाठी किंवा सत्तेसाठी केव्हाही या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या नाहीत. त्यामुळे पुढील सर्व निवडणुकांमधील यशाबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही व इतरांनीही निश्चिंत रहावे, असेही देसाई यांनी सुनावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT