मुंबई : वरळी येथील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड (नॅब) येथील जागेबाबतचा तपशील असलेली कागदपत्रे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मिळावीत, अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
नॅबच्या वतीने परिसरातील काही जागा भाडेतत्त्वावर एका ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ (कार्यक्रम आयोजक) कंपनीला १५ वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आली आहे. नियमानुसार जेवढी जागा देणे ग्राह्य आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक जागा अयोग्य प्रकारे देण्यात आल्याचा आरोप तिघा याचिकादारांनी केला आहे.
याबाबतची कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी त्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केली होती. संबंधित जागेचे बाजारमूल्य एक कोटी रुपयांपर्यंत असूनही केवळ आठ लाख रुपयांचा भाडेकरार करण्यात आल्यामुळे नॅबला तोटा होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.