मुंबई

EDचं मोठं ऑपरेशन; 'हसीना पारकर'च्या घरावर छापा, एक जण ताब्यात

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वी ED ची ही कारवाई होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा

सुधीर काकडे

मुंबईत ईडीकडून (ED) आज सकाळी अचानक मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डशी संबंधीत लोकांच्या जागांवर छापे टाकण्यात येत आहेत. दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim), इकबाल कासकर आणि हसीना पारकर यांच्याशी संबंधीत काही मालमत्तांवर ही कारवाई सुरू असल्याचं समजतंय. मुंबईतीई मोठे नेते देखील ईडीच्या रडारवर असल्याचं समजतंय. फक्त महाराष्ट्र आणि मुंबईच नाही तर दिल्लीतून देखील तपास पथकं मुंबई आल्याचं समजतंय. (ED, NIA Raids in Mumbai)

संपत्ती कराराबाबत ईडीने धाडी टाकल्या आहेत. अंडरवर्ल्डचा या करारामध्ये पैसा असल्याच्या संशयावरून ही कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. ईडी आणि एनआयएला ठोस पुरावे मिळाल्यानं या धाडी टाकल्या जात आहेत. यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचंही समोर येत आहे. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वी ED ची ही कारवाई होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून आज मुंबईत महत्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषेदत काही मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेच्या हिट लिस्टवर देवेंद्र फडणवीस असल्याची शक्यता आहे. "आम्ही सहन केले, आता बघाच, असा निर्वाणीचा इशारा खासदार संजय राऊत देत, साडेतीन लोकांना आत टाकणार" असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केल्यानंतर संजय राऊत यांच्या रडारवर भाजपचे ते साडे तीन नेते कोण असा सवाल उपस्थित होत आहे.  साडेतीन नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT