HSC Exam 2023 sakal
मुंबई

HSC Exam 2023 : कॉपीमुक्त परीक्षेचा बोजवारा! परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका; आरोपी...

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्याच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका...आरोपी नगर मधून अटकेत...गुन्हे शाखेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत बारावीची गणिताची परीक्षा सुरू होण्यापूर्वी जवळपास पाऊणतास विद्यार्थ्यांना मोबाईलवर प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे. बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी 5 मार्चला अहमदनगर येथून एका संशयीताला ताब्यात घेतले.

दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारवरून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे.

शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी 3 परीक्षार्थींसह 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दादरच्या अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील परीक्षा केंद्रात या विद्यार्थ्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला होता.

10 वाजून 17 मिनिटांनी त्याला प्रश्नपत्रिकेचा काही भाग मिळाल्याचे मोबाईलची तपासणी करता उघड झाले होते. याप्रकरणी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

परीक्षेपूर्वी पेपर हाती

तक्रारीनुसार, 3 मार्चला 12 वी विज्ञान शाखेची गणिताची परिक्षा होती. सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजून 10 मिनिटे परीक्षा चालल्यानंतर पर्यवेक्षक रॉबीन परेरा यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तर प्रत्रिका स्वीकारल्या.

त्यावेळी एका विद्यार्थ्यांकडे मोबाईल सापडला. त्यांनी हा प्रकार शाळेतील शिक्षिकेला सांगितला. त्यावेळी व्हॉट्सॲप तपासणीत 10 वाजून 17 मिनिटांनी त्याला एका मित्राने गणिताची प्रश्नपत्रिका पाठवल्याचे निष्पन्न झाले. तसेच प्रश्नपत्रिकेची उत्तरेदेखील 10 वाजून 20 मिनिटांनी मागवण्यात आली होती. त्यानुसार याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट 5 चे पथक याप्रकरणी तपास करत असताना याप्रकरणाचे धागेदोरे अहमदनगरपर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी नगर येथून एका अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू असल्याचे माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keir Starmer: मोठी बातमी! अखेर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा; नव्या PM च्या शर्यतीत मोठं नाव आघाडीवर

Konkan Railway : कोकणवासीयांवर अन्याय! दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत रेल्वेमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली; रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार

Latest Marathi News Live Update : कासारवाडीजवळ पीएमपीने तीन ते चार गाड्यांना उडवले

Fifa World Cup 2026 : यमाल दे धमाल! स्पेनच्या Lamine Yamal ने इतिहास घडविला; पेले यांच्यानंतर तोच... मेस्सीचाही विक्रम मोडला

Sangli Rain Update : किती मिलिमीटर पाऊस पडल्यावर करावी खरीप पेरणी? हंगामातील पेरणीचे 15 दिवस वाया, शेतकऱ्यांच्या हातात अजून किती दिवस शिल्लक?

SCROLL FOR NEXT