मुंबई

विनोद तावडेंकडून शिक्षण क्षेत्राची वाताहत!

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - शिक्षण क्षेत्रातील एकही प्रश्‍न न सोडवणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गेली चार वर्षे शिक्षण क्षेत्राची वाताहत केली आहे. त्यांना यंदा विधानसभा निवडणुकीचा रस्ता कठीण असल्याची टीका शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केला. शिक्षण क्षेत्रातील अन्यायाविरोधात दादर ते परळदरम्यान मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर पाटील बोलत होते. 

"समान काम, समान वेतन, समान पेन्शन, सन्मान' याची हमी संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे; मात्र या सरकारला हे मंजूर नाही. या मागण्यांसाठी भांडावे लागते, ही शोकांतिका आहे. लबाड सरकारने गेली साडेचार वर्षे शिक्षण क्षेत्रावर अन्यायाचा वरवंटा फिरवला आहे. न्यायासाठी आरडाओरडा करणाऱ्यांना हे सरकार देशद्रोही ठरवते. जनजागृती करणाऱ्यांना देशविरोधी घोषित करते. शाळा बंद करणे, अभ्यासक्रम बदलणे हा या सरकारचा अजेंडा आहे. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण वाढले. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांना देशद्रोही ठरवण्याची हिंमत सरकारने दाखवली. देशात असे कधी घडले नव्हते. शिक्षकांना छळणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुढच्या विधानसभेचा रस्ता कठीण आहे. या सरकारचे अच्छे दिन जानेवाले है, अपने दिन आनेवाले है,' असे पाटील म्हणाले. 

ही तर कॉंग्रेसची पाटीलकी - तावडे 
दरम्यान, कपिल पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी "ही तर कॉंग्रेसची पाटीलकी' असे प्रत्युत्तर दिले. 10 वीला फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना एक संधी देऊन त्यांचे वर्ष वाचविणे, आंतरराष्ट्रीय शाळांचे मंडळ निर्माण करणे, खेलो इंडियामध्ये क्रमांक एकवर येणे इत्यादी गोष्टींमुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे कपिल पाटील यांनीच आपले डोके तपासून घेतले पाहिजे, असे तावडे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT