मुंबई

ईदच्या दिवशी आवाजाची पातळी कमी, आवाज फाउंडेशनकडून नोंद

भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईत यंदा ईदच्या आवाजाचा जल्लोष ही उतरला असल्याची नोंद करण्यात आली आहे. ईद ई मिलाद दरम्यान आवाज फाऊंडेशनने ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजली. त्यानुसार, इतर सणांप्रमाणे ईद ई मिलाद सणादिवशी ही आवाजाची कमी पातळी नोंदवण्यात आली. 

आवाज फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी भायखळामध्ये फक्त एकाच मिरवणुकीस परवानगी होती. मिरवणुकीत लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई होती. भायखळा ते नागपाडा दरम्यान केलेल्या सर्व्हेनुसार, विविध मार्गावर वाहनांची रहदारी थांबवण्यात आली होती. पोलिसांच्या वाहनांना वगळता वाहतुकीचा आवाज येत नव्हता. काही भागात गर्दी असली तरी आवाजाची पातळी कमी होती. 

या दिवशी कमाल पातळी 66.1 डेसिबल नोंदवली गेली. ईद ई मिलादमध्ये आतापर्यंतची सर्वात कमी आवाजाची पातळी नोंद झाली आहे. 2018 मध्ये नोंदवण्यात आलेली सर्वाधिक ध्वनी पातळी 105.3 डेसिबल होती, जी 105.2 डीबीच्या 2017 च्या सर्वोच्च पातळीइतकीच होती. या दोन वर्षांची पातळी 2016च्या मध्ये 111.5 डेसिबल एवढी नोंदवण्यात आली जी कमी होती.

सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जास्तीत जास्त झोन-निहाय डेसिबल पातळी कायम ठेवणे आवश्यक आहे. यावर्षी ईद ई मिलाद दरम्यान आवाज कमी होण्याचे प्रमाण गणपती उत्सवासह इतर उत्सवातही नोंदवण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षात सणांच्या काळात कमी आवाजाची नोंद करण्यात आली आहे.

ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्याच्या आणि मुंबईवरील सर्व नागरिकांना होणार्‍या आरोग्यासंबंधीचे धोके कमी करण्याच्या दृष्टीने आवाज फाउंडेशनकडून आवाहन करण्यात आले आहे की, सर्व सणांमध्ये लाऊडस्पीकरचा कमी वापर केला पाहिजे. या साथीच्या आजाराने हीच मुख्य गोष्ट शिकवली आहे.

----------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Eid voice Low noise levels reported by Noise Foundation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : लगोरीने काच फोडून मोटारीतील ऐवज पळविला,कोल्हापुरातील प्रकार; चोरीची रक्कम पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Gautam Gambhir Angry: तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, २३ वर्षाच्या पोराला...! गंभीर भडकला; म्हणाला, त्याचा बाप माजी चेअरमन नाही, म्हणून...

Latest Marathi News Live Update : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन

Hemorrhoid Risk : बाथरूममध्ये मोबाईल वापरताय? फक्त आजार नाही...तर मोठ्या रोगाकडे घेऊन जातीये 'ही' सवय, संशोधनातून धक्कादायक खुलासा

Abhishek Sharma New Car : अभिषेक शर्माने घेतली नवी 'Ferrari Purosangue', किंमत अन् फिचर्स ऐकून डोळे पांढरे होतील...

SCROLL FOR NEXT