File Photo 
मुंबई

"आयआयटी टेकफेस्ट'मध्ये आईन्स्टाईन!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आयआयटी मुंबईच्या "टेकफेस्ट'मध्ये यंदा हातवारे आणि भावना ओळखणारा रोबोट पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. त्याचे नाव आहे आइन्स्टाईन. तो कोणत्याही व्यक्तीच्या भावना चटकन ओळखू शकतो, तसेच समोरील व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हेही आइन्स्टाईन ओळखणार आहे.

आयआयटी मुंबईचा टेकफेस्ट 3 ते 5 जानेवारीदरम्यान पवई कॅम्पसमध्ये रंगणार आहे. या फेस्टमध्ये दरवर्षी विविध रोबोट सहभागी होतात. 2017 च्या टेकफेस्टमध्ये नागरिकत्व प्राप्त झालेली जगातील पहिली रोबोट सोफिया सर्वांचे आकर्षण ठरली होती. यंदा टेकफेस्टमध्ये आइन्स्टाईन हा मानवी रोबोट मुंबईकरांना 5 जानेवारीला पाहता येणार आहे. सोफियाप्रमाणे किंबहुना तिच्याहून अधिक कौशल्य आइन्स्टाईन रोबोटमध्ये आहे. तो तब्बल 10 लाख व्यक्तींचे चेहरे लक्षात ठेवू शकतो, तसेच गर्दीतील व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हेही तो सहज ओळखतो.

अल्बर्ट आइन्स्टाईन हे एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांमध्ये त्यांची गणना केली जाते. याच शास्त्रज्ञानाचा रोबोट आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये दाखल होणार असल्याने अनेकांची उत्सुकता वाढली आहे.

खास वैशिष्ट्ये... 
हा रोबो व्यक्तीच्या भावना ओळखतो. व्यक्तीला भीती वाटत असेल किंवा राग येत असेल, एखादी व्यक्ती नैराश्‍यात असेल, तर तेही हा रोबोट चटकन ओळखू शकतो, ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. तसेच विचारलेल्या प्रश्‍नांनाही सहज उत्तरे देण्याची क्षमता त्याच्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Controversy : मग कोरमचा कायदाच का रद्द करत नाही? सतेज पाटील यांचा CM फडणवीसांना प्रतिप्रश्न

Palghar Talasari Earthquake Tremors : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू; तलासरीत २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा धक्का, ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा भूकंपाने हादरला परिसर

Ashti Tiger Attack Farmer Death Beed News : आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; देवळाली परिसरासह तालुक्यात प्रचंड घबराट, सकाळी १० ते ५ या वेळेतच शेतात जाण्याचे वनविभागाचे आवाहन

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT