Dahisar Toll Naka

 

ESakal

मुंबई

Eknath Shinde: दहिसर ‘टोल’चे स्थलांतर होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Dahisar Toll Naka: दहिसर टोलनाक्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे आता हा टोलनाका स्थलांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मुंबईचे प्रवेशद्वार असलेला दहिसर टोलनाका अखेर स्थलांतरित होणार आहे. वसई खाडीवरील वरसावे पुलाजवळ हा टोलनाका स्थलांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. ९) दिल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. टोलनाक्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे हा टोलनाका स्थलांतरित करण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. या निर्णयाने मिरा-भाईंदरमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दहिसर टोलनाक्यावर होत असलेली वाहतूक कोंडी स्थानिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सकाळी व सायंकाळी हा टोलनाका पार करण्यासाठी पाऊण ते एक तास लागतो. त्याचा शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठा त्रास होतोच, शिवाय इंधन वाया जाऊन प्रदूषणही होते. त्यामुळे एकतर हा टोलनाका बंद करण्यात यावा, अन्यथा तो अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी मिरा-भाईंदरचे नागरिक करीत होते.

हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर दहिसर टोलनाक्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा होती; मात्र परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. यासाठी हा टोलनाका दोन किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते.

या विषयावर मंगळवारी (ता. ९) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक आयोजित केली होती. त्यात दहिसर टोलनाका दोन किलोमीटर अंतरावरील वसई खाडीवर असलेल्या वरसावे पुलाजवळ स्थलांतर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

एक ते दीड महिन्याचा कालावधी

दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवला असून या प्रस्तावाला केंद्रीय वाहतूक मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एक ते दीड महिना वेळ लागेल, त्यामुळे या दिवाळीपूर्वी हा टोलनाका स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT