desraj (pic source- HOB page) 
मुंबई

घर विकून दिवसरात्र चालवताय रिक्षा; नातीच्या शिक्षणासाठी आजोबांचे कष्ट पाहून नेटकरी भावूक 

स्वाती वेमूल

आयुष्यात कधी कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही. मात्र प्रतिकूल परिस्थितही न डगमगता मेहनत करत राहिलो तर यश नक्की मिळतं, हे देसराज यांच्याकडे पाहून समजतं. मुंबईतील हे देसराज आजोबा कुटुंबीयांसाठी व नातीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र ऑटोरिक्षा चालवत आहेत. अशा परिस्थितीतही त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन पाहून नेटकरी भारावले आहेत. 

देसराज यांच्या दोन्ही मुलांच्या निधनानंतर कुटुंबातील सात जणांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यातच त्यांची पत्नीसुद्धा आजारी पडली. मुंबईत दिवसभर रिक्षा चालवून देसराज आजोबा महिन्याला जवळपास दहा हजार रुपये कमावतात. कुटुंबीयांची जबाबदारी असतानाही त्यांनी नातीचं शिक्षण थांबू दिलं नाही. "माझ्या सूनेची आणि चार नातींची जबाबदारी मला शांत बसू देत नाही. माझ्या मुलाच्या निधनानंतर नातीने मला विचारलं की मला आता शाळा सोडावी लागेल का? त्यावेळी मी तिला शिक्षण सुरू ठेव आणि जितकी इच्छा असेल तिथपर्यंत शिक असं खडसावून सांगितलं", असं देसराज 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' या सोशल मीडिया पेजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. त्यांची ही पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

"गेल्या वर्षी माझ्या नातीला बारावीत ८० टक्के मिळाले. त्यावेळी माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. हा आनंद साजरा करण्यासाठी मी एक दिवस मोफत रिक्षासेवा पुरवली होती. तिला शिक्षिका व्हायचं आहे आणि पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीला जाणार आहे. दुसऱ्या शहरात तिचं शिक्षण आणि राहण्याचा खर्च माझ्या ऐपतीपलीकडे होतं. मात्र तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं घर विकलं आणि तिची फी भरली", असं त्यांनी सांगितलं. 

आता देसराज यांचं कुटुंब गावी राहतं आणि ते मुंबईत रिक्षा चालवतात. त्यांची नात जेव्हा फोन करून तिच्या शैक्षणिक यशाबद्दल सांगते, तेव्हा मी सगळं दु:ख विसरतो, असं ते अभिमानानं सांगतात. इतकंच नव्हे तर तिने पदवीच्या शिक्षणात ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर मी पूर्ण आठवडा मोफत रिक्षासेवा देईन, असं ते आनंदाने सांगतात. देसराज यांची पोस्ट वाचून अनेकांनी त्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. काहींनी त्यांच्या नातीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचंही आश्वासन दिलं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT