vasai virar 
मुंबई

लॉकडाऊनमुळे निवडणूक लांबणीवर, वसई-विरार पालिकेवर प्रशासक ?

सकाळवृत्तसेवा

विरार : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला आहे. 
निवडणूक आयोगाने देखील सर्व निवडणूका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे काही दिवसात होणाऱ्या निवडणूक पुढे ढकलल्या असल्याने त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याची शिफारस निवडणूक आयोगाने राज्य सरकारला केली आहे. त्याचा फटका वसई-विरार महापालिकेलाही बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पालिकेची मुदत २८ जून ला संपत आहे आणि लॉकडाऊनमुळे याठिकाणी एवढ्यात निवडणूक होणार नाही. त्यामुळे  राज्य शासनाने निवडणूक आयोगाची शिफारस मान्य केल्यास पालिकेवर प्रशासकाची नेमणूक होणार असल्याचे समजते. पालिकेची निवडणूक किमान सहा महिने पुढे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. असे झाले तर विद्यमान सदस्यांना मुदत वाढ द्यायची की याठिकाणी प्रशासक नेमायचे याचा फैसला आता राज्य सरकारला करावा लागणार आहे. 

राजकिय वर्तुळात चर्चा
वसई-विरार पालिकेचे तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार निवृत्त झाल्या नंतर जवळपास तीन महिन्या नंतर आयुक्तपदी गंगाधरण डी. यांची शासनाने नेमणूक केली आहे. त्यापूर्वी प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी कैलास शिंदे हे काम पाहत होते. त्यामुळे आता पुन्हा प्रशासक आल्यास येथील कारभार हा प्रशासकाच्या हातात जाणार आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

Election on postponement due to lockdown, administrator on Vasai-Virar municipality?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT