धारावी : धारावीतील कोरोना संसर्ग पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आता नियंत्रणात आला आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांना अजूनही तीन महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना रुग्णांसाठी धारावी बस डेपोलगत कोव्हिड केंद्र उभारण्यात आले होते. केंद्रात डॉक्टर, नर्स आदी कर्मचाऱ्यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली होती. केंद्रास अभिनेता अजय देवगननेही मदत केली होती. मात्र, येथील कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याचे सांगितले आहे.
वेतनासाठी अनेकदा मागणी केली. मात्र, दरवेळी तोंडाला पानेच पुसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हण्णे आहे. सध्या या केंद्रात फक्त 20 रुग्ण आहेत. यातील अनेक रुग्ण बरे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित रुग्णांना दुसऱ्या केंद्रात पाठवण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. येत्या 30 आॅगस्टनंतर केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. केंद्र बंद झाल्यास पालिका कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी केला आहे.
बस डेपोलगतच्या कोव्हिड केंद्रांत रुग्ण कमी असल्याने ते बंद करण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे जुन, जुलैचे वेतन प्रशासनातर्फे काढण्यात आले आहे. आॅगस्टचे वेतनही सप्टेंबरच्या सुरूवातीलाच दिले जाईल.
- किरण दिघावकर, सहायक आयुक्त, ग/ उत्तर विभाग
Employees of Dharavi health center do not get salary for three months(संपादन ः रोशन मोरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.