इंजिनीअरिंग, डिप्लोमा अंतीम सत्राची परीक्षा होणार; असे असेल वेळापत्रक 
मुंबई

इंजिनीअरिंग, डिप्लोमा अंतीम सत्राची परीक्षा होणार; असे असेल वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याप्रमाणे राज्य सरकारनेही पदवीच्या अंतिम सत्राची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता इंजिनीअरिंग, डिप्लोमाच्या शेवटच्या सत्राची परीक्षा घेण्याचा, महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने घेतला आहे. 

सर्व पदविका अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राची परीक्षा घेण्याचा निर्णय मंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेतला. सहा सत्राच्या इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची सहाव्या सत्राची तर दोन वर्षांच्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची दुसऱ्या वर्षाची परीक्षा घेण्यात येणार आहे. तीन वर्षाच्या मायनिंग अभ्यासक्रमाची तृतीय वर्षाची तर आठ सत्रांच्या अर्धवेळ अभ्यासक्रमाची आठव्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल. या सर्व परीक्षांचे आयोजन 9 जुलै पासून पुढे करण्यात येणार आहे. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. 

याचबरोबर या आधीच्या सत्राच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न होता त्यांना सम सत्रातील अथवा अंतर्गत मूल्यमापन करून गुण दिले जाणार आहेत. तर औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमातील टीएमचे गुण मुल्यांकन फक्त प्रथम व द्वितीय चाचणी परीक्षेच्या आधारे करण्यात येईल. यासाठीही 50:50 चे सूत्र वापरण्यात येईल. यात लगतच्या आधी एका सत्राचे 50 टक्के गुणांच्या अधारावर आणि ज्या सत्राचे निकाल जाहीर करायाचा आहे, त्याच्या 50 टक्के अंतर्गत गुणाच्या अधारावर गुण देऊन निकाल जाहीर करण्यात येईल असाही निर्णय घेण्यात आला. तसेच लॉकडाउनचा कालावधी विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

शैक्षणिक वर्षाचे अंदाजित वेळापत्रक

  • तंत्रनिकेतन संस्था सुरू होणार - 15 जून
  • परीक्षा पूर्व कामे - 30 जून
  • अंतर्गत परीक्षांचे आयोजन - 1 ते 8 जुलै
  • अंतिम परीक्षांचे आयोजन - 9 जुलैपासून पुढे
  • निकाल जाहीर होणार - ऑगस्टचे प्रथम वर्ष

2020-21 शैक्षणिक वर्ष द्वितीय वर्षापुढील डिप्लोमा - 1 ऑगस्ट
2020-21 शैक्षणिक वर्ष प्रथम वर्ष डिप्लोमा - 1 सप्टेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG दरवाढीचा नवा धक्का! गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ... मुंबई-पुण्यात दर किती?

'तो संपूर्ण रात्र दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी...' तबिंदा सनपाल नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...'तो दर दिवाळीत तीन किलो सोनं देतो'

Chandgad Drowning Child : आजीच्या निधनामुळे गावी गेल्या अन् तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, चंदगडमधील घटना; लहान भावाचे प्रयत्न असफल...

Buldhana Tragedy: पत्नीशी वादानंतर टोकाचे पाऊल! चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवले, बुलडाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Maharashtra Accident: सोमवार ठरला ‘अपघातवार’; एकच दिवशी १४ जणांचा मृत्यू, आंबेनळीत मोटार कोसळून आठ तर तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT