मुंबई

मॉलमध्ये फिरायचेय? ऍन्टिजेन चाचणीनंतरच मिळणार प्रवेश...

राजेश मोरे

ठाणे : ठाण्यातील मॉलमध्ये केवळ फेरफटका मारण्याची इच्छा असलेल्या नागरिकांना सध्या आपल्या इच्छेला मुरड घालावी लागणार आहे. कारण, कोणत्याही मॉलमध्ये जाण्यापूर्वी कोरोना ऍन्टिजेन चाचणी करावी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी मॉलच्या बाहेर पालिकेच्या वतीने ऍन्टिजेन चाचणी पथक तैनात करण्यात आले आहे. 

मॉलमधील कर्मचारी आणि इतर अशी सुमारे 140 जाणांची गुरुवारी चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला तत्काळ उपचारांसाठी रवाना करण्यात आले. यापुढील काळातही अशाप्रकारे ऍन्टिजेन टेस्टचा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली. पालिकेच्या या भूमिकेमुळे कोरोना टेस्ट केल्याशिवाय नागरिकांना व्हिवियाना अथवा इतर कोणत्याही मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मुळात व्हिवियाना मॉलच्या व्यवस्थापनालादेखील सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळण्यासाठी गर्दी टाळण्याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी एकाच वेळी दहा ते वीस हजार नागरिकांना मॉलमध्ये करता येत होता. आता मात्र, पाच हजार नागरिकांपेक्षा जास्त नागरिकांना येथे एकाच वेळी प्रवेश करता येणार नाही.

त्यातही मॉल म्हटले की काही जण केवळ फेरफटका मारण्यासाठी मॉलमध्ये जात असतात. पण अशा नागरिकांमुळे मॉलमध्ये नाहक गर्दी होत असते. त्यामुळे खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही या गर्दीचा त्रास होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सर्व नागरिकांची ऍन्टिजेन चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

याबाबत व्हिवियाना मॉलचे सीईओ मनोज अगरवाल सांगितले की, मॉलमधील वातावरण सुरक्षित राहण्यासाठी आम्ही सर्वतोपरी कारवाई केलेली आहे. तसेच पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशांनुसार येथे प्रवेश करणाऱ्या नागरिकांसाठी ऍन्टिजेन चाचणी अनिर्वाय करण्यात आली आहे. मॉलमध्ये प्रवेश करताना थर्मल तपासणी देखील केली जाणार आहे.

मॉलमध्ये आयसोलेशन विभाग उभारण्यात आला असून तेथे प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज रात्रीच्या वेळी अतिथींच्या स्वागतासाठी संपूर्ण मॉल परिसर निर्जंतुक होईल. मॉलच्या व्यवस्थापनाने अल्ट्राव्हायोलेट जर्माइडल इरॅडिएशन (यूव्हीजीआय) उपचार आणि बॅग स्कॅनिंगसह सर्व प्रवेशद्वारांवर स्वच्छता बोगदा ठेवला आहे.

परिसर सतत स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण ठेवण्यासाठी यूव्हीजीआय तंत्रज्ञानाचा समावेश वातानुकूलन प्रणालीमध्ये केला गेला आहे. व्हिव्हियाना मॉलने एस्केलेटर बेल्ट्स स्वच्छ करण्यासाठी यूव्ही लाइट स्थापित केल्याची माहिती अगरवाल यांनी दिली. 

मॉलमध्ये जाण्यासाठी कोणालाही अटकाव नाही, पण हा शहराच्या आरोग्याचा प्रश्‍न असल्याने येथे येणाऱ्यांना ऍन्टिजेन चाचणी अनिर्वाय आहे. येथे शेकडोंच्या संख्येने नागरिक येण्याची शक्‍यता असल्याने ही खबरदारी घेतली जाणार आहे. मुळात कोरोनाची लागण असलेल्या रुग्णाचा प्रवेश अशा ठिकाणी होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. 
- डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका 

----------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचा हिचा भीषण अपघात, ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत आणलं, Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT