worker 
मुंबई

टाळेबंदीतही 'या' योजनेने केली कमाल, तब्बल 2000 मजुरांच्या हाताला मिळाले काम

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा

ठाणे : टाळेबंदीमुळे अनेक स्थलांतरीत झालेल्या मजुरांनी आपल्या घरची वाट धरली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या घरकुलांच्या कामांना मजूर व साहित्याविना ब्रेक लागला होता. मात्र, टाळेबंदीतून काही अंशी सूट मिळाल्यानंतर अर्धवट व रखडलेली कामे स्थानिक मजुरांच्या सहाय्याने पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होऊन सुमारे 654 घरकुलांची कामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून देण्यात आली.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे या टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेतील अस्थापना व शासकीय कार्यालयांव्यतिरिक्त अन्य अस्थापना व सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली. त्यामुळे खासगी कार्यालयात काम कर्मचार्यांसह मजुरीची कामे करणाऱ्या मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यात कामानिमित्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये स्थलांतरीत केलेल्या असंख्य मजुरांवर टाळेबंदीमुळे बेरोजगारी ओढवल्याने त्यांनी आपल्या घरची वाट धरली. याचा परिणाम जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रधानमंत्री, शबरी आणि अदिम घरकुल योजनेच्या कामावर देखील झाला होता. जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या घरकुलांच्या मजूर व साहित्याविना ब्रेक लागला होता.

मात्र, टाळेबंदीतून मजुरीच्या व विविध योजनेंतर्गत कामे सुरू करण्याची मुभा सरकारने दिल्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील अर्धवट व रखडलेल्या घरकुलांच्या कामांना जोमाने सुरुवात करण्यात आली. त्यानुसार 30 एप्रिल ते 9 जुलैपर्यंत जिल्ह्यात 654 घरकुलांची कामे पूर्ण करण्यात आली असून जवळपास दोन हजार मजुरांच्या हाताला यामुळे काम मिळाले.

सरकारने टाळेबंदीत काही कामांना सूट दिल्याने जिल्ह्यात रखडलेली कामे व अर्धवट घरकुलांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. त्यामुळे त्याचा फायदा मजुरांना देखील झाला असून अनेक घरकुलांची कामे मार्गी लागली आहेत. 
डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक, 
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे.  

योजनांतर्गत पूर्ण झालेली कामे -
तालुका  -  प्रधानमंत्री  -  शबरी  -  अदिम 

  • अंबरनाथ  -  28  -  44  -  01
  • भिवंडी  -  42  -  51  -  21
  • कल्याण  -  16  -  11  -  00
  • मुरबाड  -  164  -  40  -  03
  • शहापूर  -  180  -  43  -  10
  • एकूण  -  430  -  189  -  35

(संपादन : वैभव गाटे)

even in the lockdown the scheme did a work for 2000 workers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

पुण्यातील ऐतिहासिक पर्वती टेकडीचे सौंदर्य धोक्यात? TDR वाटपाचा वाद पुन्हा पेटला; चतुःशृंगी-शनिवारवाड्याला वेगळा न्याय का?

Latest Marathi News Updates : वाहतूक कोंडीवर सोमवारपर्यंत अहवाल द्या, पुणे पालिका आयुक्तांचे आदेश

iPhone 17 आजपासून भारतात उपलब्ध, खरेदीसाठी स्टोअरबाहेर झुंबड; मध्यरात्रीपासून रांगेत, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT