मुंबई

सर्वात मोठी बातमी - मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट...

सकाळवृत्तसेवा

मुंबई- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात फडणवीसांनी आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार, असंही फडणवीसांनी विचारणा केली आहे. फडणवीस यांच्या या दाव्याने नव्या वाद होण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पत्रात 

सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला, तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणं नॉन-कोव्हिड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला.

शासनाकडूनही एक पत्र 

हे प्रकरण दडपण्यासाठी एक पत्र शासनाने पाठविले असून, त्यात करोनासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी अपडेट करायची आहे, ती तातडीने पाठवा, असे त्यात म्हटले आहे. असे करून झालेला प्रकार जाणूनबुजून लपविण्याचा दुबळा प्रयत्न होताना दिसून येतो आहे. याबाबत कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचं फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे. 

आयसीएमआरच्या गाइडलाइन्स डावलून महापालिकेच्या समितीने करोनामुळे झालेले मृत्यू हे कोरोनाचे नाहीत, असे दर्शविले होते. आता आयसीएमआरकडून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तपासणी करून 356 अपात्र ठरविलेले करोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरणे असे मिळून सुमारे 451 मृत्यू हे कोविड मृत्यू आहेत आणि आता ते पोर्टलवर तत्काळ नोंदविले गेले पाहिजेत, असंही त्यांनी पत्रात लिहिलं आहे.

आयसीएमआरचे स्पष्ट दिशानिर्देश असताना आणि कोरोनामुळे मृत्यू झालेले असताना सुद्धा ते कोरोना मृत्यू नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार समितीला दिला कुणी? कोणते मृत्यू हे कोरोना मृत्यू नाहीत, याबाबत तीन वर्गवारी स्पष्टपणे आयसीएमआरने दिल्या आहेत. पण, येथे मनात येईल, त्याप्रमाणे करोनाचे मृत्यू कोरोना नसल्याचे ठरविण्यात आले आहे. ही बाब केवळ अक्षम्य दुर्लक्षाचीच नसून गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात मोडणारी आहे, हे मला दुर्दैवाने नमूद करावे वाटते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.

विविध रुग्णालयांनी मृत्यू झाल्यानंतर ते सारे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले आहे, अशी सुमारे 500 प्रकरणं आहेत. पण, ती प्रकरणं ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे सादरच करण्यात आलेली नाहीत. यात सुद्धा कुणाचा दबाव होता आणि नसेल तर असे न करणार्‍यांवर राज्य सरकार काय कठोर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. हे दोन्ही प्रकार अतिशय गंभीर आणि गुन्हेगारी स्वरुपाचे आहेत. पारदर्शिता हा एकमेव मंत्र लोकांना सजग करण्याचा आहे. कोरोनासंदर्भातील संपूर्ण माहिती योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहोचली तरच ते योग्य काळजी घेऊ शकतात. अशात या दोन्ही प्रकारांकडे पाहता सुमारे 950 वर मृत्यू हे मुंबईत कोरोनामुळे अधिकचे झालेले आहेत. पण, त्याची नोंद मात्र अद्याप झालेली नाही. मुंबईतील कोरोना स्थितीची दाहकता यामुळे अधिक स्पष्ट होते, असंही फडणवीस पत्रात म्हणालेत.

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना विनंती

माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, याची माहिती जनतेला द्यावी आणि असे गैरप्रकार करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ex cm devendra fadanavis writes a letter to cm uddhav thackeray

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT