मुंबई

कोरोनायोद्ध्यांची व्यवस्था मुंबईत करणे अशक्य  राज्य सरकारकडून असमर्थता व्यक्त; उच्च न्यायालयाने मागितला लेखी खुलासा

सकाळ वृत्तसेवा


मुंबई :  मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करणे शक्य नाही, अशी हतबलता शुक्रवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात व्यक्त केली.  

वसईतून येणाऱ्या कोरोनायोद्ध्यांची मुंबईतच राहण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अन्य भागांमध्ये होणार नाही, अशा मागणीच्या जनहित याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. वसईतील व्यावसायिक चरण भट यांनी अॅड्. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. याचिकेतील मागणीची पूर्तता करण्याबाबत राज्य सरकारने असमर्थता व्यक्त केली.  व्यावहारिक दृष्टीने ही मागणी पूर्ण करणे शक्य नाही, असे सरकारच्या वतीने अॅड्. प्रियभूषण काकडे यांनी सांगितले. याबाबत राज्य सरकारने लेखी खुलासा करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. याचिकेवर पुढील सुनावणी  22 मे रोजी होईल.
मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

लॉकडाऊनमध्येही जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या यंत्रणा काम करत आहेत. त्यासाठी वैद्यकीय, पोलिस, मंत्रालयीन, महापालिका, स्वच्छता कर्मचारी वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि अन्य ठिकाणांहून दररोज मुंबईत येत असतात. हे कर्मचारी दररोज बसने प्रवास करतात. त्यामुळे त्यांना आणि कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था मुंबईतच करावी, अशी मागणी याचिकदाराने केली आहे. मुंबईत निवासाची व्यवस्था करणे शक्य नसल्यास वसईतून या कर्मचाऱ्यांना बोलावू नये, असेहीही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या, मध्यरात्री घडलेल्या हत्याकांडाने खळबळ

Pune Traffic : पुणे-बंगळूर सेवा रस्त्यांची बिकट अवस्था! खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त; पावसाळ्यात धोकादायक स्थिती

Anurag Thakur: देशात अस्थिरता निर्माण करण्याचा कट; भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल यांच्या टीकेचा समाचार

लग्न ठरत नाही म्हणून ढसाढसा रडली स्वानंदी, प्रोमो पाहून प्रेक्षक हळहळले "या तिच्या खऱ्या भावना"

VIDEO VIRAL: श्रद्धाने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडला टॅग करत म्हणाली... 'हे नखरे सहन करु शकतो का?' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT