पॉलिटेक्‍निकच्या थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या अर्जासाठी मुदतवाढ  
मुंबई

पॉलिटेक्‍निकच्या थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या अर्जासाठी मुदतवाढ

तेजस वाघमारे

मुंबई : तंत्रशिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या पॉलिटेक्‍निक थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढीनुसार विद्यार्थ्यांना 7 ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणीसह अर्ज निश्‍चितीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 15 ऑक्‍टोबर रोजी जाहीर होणार आहे.


तंत्रशिक्षण विभागामार्फत 17 ऑगस्टपासून पॉलिटेक्‍निक थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला विभागाने मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीनुसार विद्यार्थ्यांना 7 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्‍चितीही याच कालावधीत करता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. ऑफलाइनसह ऑनलाइन कागदपत्र तपासणी, अर्ज निश्‍चितीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जिल्ह्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी 10 ऑक्‍टोबरला जाहीर होईल. तर 15 ऑक्‍टोबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 
---------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT