मुंबई

अश्लील कॉल सर्विसच्या माध्यमातून सुरु होता 'हा' काळा धंदा, 'ही' आहे मोडसऑपरेंडी...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मलबार हिलमधील व्यावसायिकाला इस्टाग्रामवरून अश्लील कॉल सर्विस देण्याचा संदेश पाठवून  खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने इस्टाग्रामवर तक्रारदाराच्या नावाचे बनावट खाते तयार करून अश्लील कॉल सुविधा वापरत असलेला व्यक्ती असल्याची बदनामी केली. याप्रकरणी मलबार हिल पोलिस अधिक तपास करत आहेत.

मलबार हिल येथे राहणा-या व्यावसायिकाला 19 मे रोजी एका महिलेच्या इस्टाग्राम खात्यावरून संदेश आला होता. त्यात व्हिडिओ कॉल सर्विस पुरवण्यात येते, असा नमुद करण्यात आले होते.

त्यानंतर या महिलेने एक अश्लील व्हिडिओ या व्यावसायिकाला पाठवला. त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर तक्रारदाराला व्हिडिओ कॉल आला. त्यात एक महिला नग्न अवस्थेत बसलेली होती. 10 सेकंद चाललेल्या या दूरध्वनीनंतर तक्रारदाराला खंडणीसाठी दूरध्वनी येऊ लागले. सुरूवातीला 20 हजार भरल्यांनतर या व्यावसायिकाच्या पत्नीलाही आरोपीचे दूरध्वनी येऊ लागले.

तिनेही बदनामीच्या भीतीने 20 हजार रुपये दिले. पुढे  तक्रारदार व्यावसायिकाच्या नावाने बनावट इस्टाग्राम खाते तयार करून त्यावर हा व्यक्ती अश्लील कॉल सर्विसचा वापर करत असल्याचे आरोपीने नमुद केले होते. हा संदेश व्यावसायिकाच्या ओळखीच्या व्यक्तीने पाहिल्यानंतर त्याला याबाबत माहिती दिली.

व्यवसायिकाने याबाबत पडताळणी केली असता संबंधीत इस्टाग्राम खाते एक पुरुष दिल्लीतून हाताळत असल्याची माहिती समजली. अखेर या व्यवसायिकाने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार सायबर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

extortion racket busted by mumbai police read how they used to operate

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT