geeta yatarth.
geeta yatarth. 
मुंबई

टॉयलेटमधील फोटो शेअर करुन महिलेने फोडलं नव्या वादाला तोंड; नेमकं काय आहे प्रकरण?

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- टॉयलेटचा दरवाजा अर्धा उघडा ठेवून कमोडवर बसलेल्या एका महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर (Facebook post of bathroom pic) व्हायरल होत आहे. महिलेच्या या कृतीने एका वेगळ्याच चर्चेला तोंड फोडलं आहे. अनेकांनी या महिलेवर टीकेची झोड उटवली आहे, तर दुसरीकडे काहीजण या महिलेच्या समर्थनात पुढे आले आहेत. या महिलेचं नाव आहे गीता यथार्थ. गीता या भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत असून त्या एक लेखिकाही आहेत.  त्यांनी फेसबुकवर टाकलेल्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. गीता  'एकल पालक' (single parent) आहेत. म्हणजे त्या एकट्यानेच मुलाचं संगोपण करतात. त्यांनी दरवाजा अर्धा उघडा ठेवत कमोडवर बसलेला एक फोटो शेअर केलाय. त्यांनी या फोटाच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'टॉयलटचं दार मी सर्वात शेवटी कधी बंद केलं होतं, मला आठवत नाही. आता तर ऑफिसमधील टॉयलेटचं दार बंद करणं विसरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता माझ्या मुलीला फोटो काढणंही जमू लागलं आहे'. गीता यथार्थ यांनी या पोस्टला 'लाईफ ऑफ द सिंगल मदर' असं म्हटलं आहे. मदरहूड म्हणजे आईपण निभावणं सोपं काम नाही. तो स्वर्गीय अनुभव तर अजिबातच नाही. त्यामुळे त्याचं उदात्तीकरण थांबवा, असं त्या पुढे म्हणाल्या आहेत. मुलांचा सांभाळण करणं सोपं नाही, त्यांच्यावर प्रत्येकवेळी लक्ष ठेवावं लागतं, असं गीता यांना या फोटोमधून दाखवून द्यायचंय. 

गीता यथार्थ यांची पोस्ट अनेकांना रुचली नसल्याचं दिसून आलं. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना असभ्य भाषा वापरत त्यांना ट्रोल केलं. अनेकांनी त्यांना प्रसिद्धीसाठी असं करत असल्याचं म्हटलं तर, अनेकांनी बाळाला सांभाळणं यात नवीन काय आहे. पुरुषांनाही हे करावंच लागलं, असं म्हटलं. तसेच त्यांच्यावर अश्लीलता पसरवण्याचा आरोप केला आहे. पण, गीता यांनी आपल्या पोस्टचं समर्थन करत ट्रोलर्संना चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी आपली भूमिका आणखी एक पोस्ट करुन सविस्तरपणे मांडली आहे. पुरुषांवर ही जबाबदारी काही काळासाठी देण्यात आलेली असते. ही जबाबदारी त्यांच्याकडे पूर्णवेळासाठी नसते. अजून आपण मदरहूड हा शब्द पॅरेंटहूडने बदलू शकलेलो नाही. आईपण महान असतं असा बागुलबुवा करण्यात आला आहे आणि याचाच वापर करुन त्यांना गप्प केलं जातं. समानतेच्या गोष्टी केल्या जातात. त्याबाबत कोणी काही करताना दिसत नाही. याला वाचा फुटावी म्हणून या फोटोला निमित्त म्हणून पाहणं अपेक्षित आहे, असं त्या म्हणाल्या.

देश-विदेशातील अनेक महिलांनी अशाचप्रकारचे फोटो पोस्ट करत या गोष्टीला वाचा फोटण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचच अनुकरण गीता यथार्थ यांनी केलं आहे. या महिलांनी baathroompic हा हॅशटॅग वापरला आहे. भारतीय संस्कृतीत महिलेच्या मातृत्वाला उच्च स्थान आहे किंवा तसं मानलं तरी जातं. आपल्या पोथीपुराणांमधून मातृत्वाचा गौरव आपल्याला दिसून येतो. महिलेने आई होणं तिचं पूर्णत्व असल्याचं मानलं जातं. भारतीय संस्कृतीत महिलांना मातृत्वाच्या रुपात टाकून त्यांना मुलांची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. मुलाला सांभाळणे ही केवळ महिलेचीच जबाबदारी आहे, असंही समाजात रुजवण्यात आलं आहे. पण, आईपण निभावताना महिलांना होणारा त्रास क्विचितच बोलून दाखवला जातो. फेसबुरवर पोस्ट टाकून गीता यथार्थ यांनी हीच गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

दरम्यान, गीता यथार्थ या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी हिंदी, इंग्रजीमधील अनेक महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधून आणि मासिकांमधून लिखाण केलं आहे. त्या लिंग समानता, समाज आणि संस्कृतीविषयी आपली भूमिका जोरकसपणे मांडत असतात.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT