मुंबई

2100 कोटी रुपयांच्या बोगस पावत्यांचे वितरण, बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 185 कोटींचा GST गैरव्यवहार

अनिश पाटील

मुंबई, ता. 23 : बनावट कंपन्यांच्या माध्यमातून बनावट पावत्या वितरीत करून 185 कोटी रुपयांचे जीएसटी नुकसान केल्याप्रकरणी राज्य वस्तू व सेवा कर विभागाने (जीएसटी) एका कंपनीच्या संचालकाला अटक केली आहे. आरोपीने 30 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून बनावट पावत्या वितरीत करून 2100 कोटी रुपयांचा बनावट व्यवहार झाल्याचे दाखवण्यात अनेक कंपन्यांचा मदत केल्याचा आरोप आहे.

दिलीप रामगोपाल तिब्रेवाल असे अटक करण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे. मेसर्स ऑगस्ट ओव्हरसिज लि., आर्यनमन ग्लोबल प्रा. यासह सह 30 बनावट कंपन्या बनवल्याचा आरोप आहे. त्यातील चार कंपन्यात कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असल्याचे जीएसटी विभागाकडून सांगण्यात आले. मालाड पश्चिम येथील घरातून त्याला राज्य जीएसटी विभागाने सोमवारी अटक केली. याप्रकरणी न्यायालयाने त्याला 5 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत जीएसटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तिब्रेवाल 30बोगस कंपन्यांच्या माध्यमातून विक्रीच्या बनावट पावत्या देत होते. त्याच्या माध्यमांतून 2100 कोटी रुपयांच्या पावत्या वितरीत करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या माध्यमातून इतर कंपन्यांनी 185 कोटी रुपयांचा  कर परतावा मिळवल्याचे अंदाज आहे. त्यामुळे सरकारला 185 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचे जीएसटी विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार राज्य जीएसटी विभागाने महाराष्ट्र जीएसटी कायदा कलम 69 अंतर्गत ही कारवाई केली.

( संपादन - सुमित बागुल )

fake receipts worth 2100 crore distributed 185 crore GST fraud through fake companies

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT