मुंबई

फेक टीआरपी प्रकरण! अर्णब गोस्वामी मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करणार

सुनिता महामुनकर

मुंबई - फेक टीआरपी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी मुंबई पोलिसांच्या चौकशीला हजर राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुणावनी दरम्यान त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच न्यायालयाने मुंबई पोलिसांना याप्रकरणाच्या चौकशीचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

रिपब्लिकन टीव्ही वृत्तवाहिनेचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांच्यावतीने फेक टीआरपी प्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी फेक टीआरपीचे रॅकेट उघडकीस आणले होते त्यात, बॉक्स मराठी आणि फक्त मराठी या वाहिन्यांवरही आरोप ठेवण्यात आले होते. अर्णब यांनी या नोटीसीबाबत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार आज सुणावनी झाली. न्यायालयातील सुणावनी दरम्यान, अर्णब यांनी आरोप केला की, पोलिसांनी पाठवलेली नोटीस सूडाच्या भावनेने आहे. तरी मुंबई पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करण्याचे अर्णब यांनी न्यायालयात सांगितले आहे. पोलिसांनी ही कारवाई फेक टीआरपी प्रकरणी होत असल्याने त्यात कोणताही आकस नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने याप्रकरणाच्या चौकशीचा अहवाला मुंबई पोलिसांना सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या वतीने एड कपिल सिब्बल युक्तीवाद करीत आहेत. तर अर्णब यांच्या वतीने एड हरिष साळवे युक्तीवाद करीत आहेत. या प्रकरणाची पुढील सुणावनी 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT