मुंबई

फेक टीआरपी प्रकरण! रिपब्लिक टीव्हीच्या सीएफओसह पाच जणांना पोलिसांचा समन्स

अनिश पाटील

मुंबई - फेक टीआरपीप्रकरणी गुन्हे शाखेने रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्तीय अधिकारी(सीएफओ) शीवा सुब्रमण्यम सुंदरम यांना गुन्हे शाखेने समन्स पाठवला आहे. समन्सनुसार शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित राहण्यात सांगितले आहे. याशिवाय दोन जाहिरात कंपनीसह दोन मराठी वाहिन्यांच्या अकाउंटंटलाही याप्रकरणी पोलिसांनी समन्स पाठवले आहेत.

मुंबई पोलिसांनी नुकतेच एक खोटा टीआरपी मिळवण्याच रॅकेट उध्वस्त केलं असून त्यात रिपब्लिक भारत, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा ही तीन चॅनेल्स आहेत.  ज्यांनी खोटा टीआरपी मिळवला होता असं मुंबई पोलिसांच्या तपासात उघडकीस आलंय. माध्यमांचा टीआरपी बीएआरसी नावाची संस्था ठरवत असते. बीएआरसीने हे कंत्राट हंसाा नावाच्या संस्थेला दिलं होतं. मात्र हंसा कंपनीतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या तीन वाहिन्यांनी हा गैर प्रकार केल्याचे समोर आले आहे.  जून महिन्यात आरोपींचा हा सहभाग निश्चित झाल्यनंतर दोन कर्मचाऱ्यांना हंसाा कंपनीने काढून टाकले होते. या खोट्या टिआरपी विरोधात हंसा कंपनीने गुन्हा नोंदवल्यानंतर दोन आरोपींना काल चौकशीसाठी बोलावले होते. या दोघांनी चौकशीत हे खोट्या टिआरपीच्या रँकेटची कबूली दिली. त्यानुसार  मुंबई पोलिसांच्या सीआयूच्या पथकाने दोघांना अटक केली होती. आता याप्रकरणी गुन्हे शाखेने रिपब्लिक टीव्हीचे सीएफओ सुब्रमण्यम यांना उद्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. याशिवाय रिपब्लिकसाठी काम करणा-या दोन जाहिरात कंपनी यांनाही गुन्हे शाखेने याप्रकरणी समन्स पाठवले आहे. तसेच बॉक्स सिनेममा व फक्त मराठी या वाहिन्यांच्या अकाउंटंट यांनाही गुन्हे शाखेने समन्स पाठवले आहे.

गुन्हे शाखेच्या तपासानुसार, रिपब्लिक भारत बरोबरच फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस हे दोन चॅनेल्ससुद्धा फेक टीआरपी प्रकरणात अडचणित आले आहेत..फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस चॅनेलच्या मालकांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत मात्र रिपब्लिक चॅनेल्सच्या मॅनेजमेंटची चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग म्हणालेत. मुंबईतील 1800 घरामध्ये पैसे देऊन हे चॅनेल्स चालू ठेवावेत अस सांगण्यात आलं होतं त्यानुसार हा टीआरपी वाढवण्यात हातभार लावण्यात आला. महिन्याला 400 ते 500 रुपये या लोकांना देऊन टीआरपी वाढवण्यात आला.
----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: वसुली एजंट्सचे कर्जदाराशी गैरवर्तन सहन केले जाणार नाही; बँका आणि एजंटना इशारा, RBI कडून नवे नियम जारी

IND vs PAK : तो अपयशी होण्याची शक्यता अधिक आहे! पाकिस्तानी खेळाडू अभिषेक शर्माला म्हणाला, slogger...; केला अपमान

Mumbai Pune Expressway traffic update: सुट्टीचा प्लॅन बिघडला! विकेंडच्या सुरुवातीलाच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

सगळ्यात कमी वयाची नायिका पडतेय सगळ्यांवर भारी; 'कमळी'ची TRPमध्ये मोठी उडी; जुई गडकरीचं स्थान धोक्यात

Thane News: ३०० झाडांची बेकायदा कत्तल! सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर

SCROLL FOR NEXT