Mira Bhayandar news esakal
मुंबई

Mumbai News: भाईंदरच्या स्थानकात रेल्वेखाली येऊन बाप-लेकानी संपवलं जीवन

Mumbai News In Marathi: रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

Sandip Kapde

सोमवारी सकाळी १०.३० वाजता भाईंदर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर दोन जणांनी रेल्वेच्या खाली येऊन आत्महत्या केली. हे दोघे वसईमध्ये राहणारे पिता-पुत्र होते. वडील हरिश मेहता (६० वर्षे) आणि मुलगा जय मेहता (३५ वर्षे) असे मृतांची ओळख पटली आहे. नालासोपारा येथील रहिवासी असलेल्या या बाप-लेकाच्या अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानकात खळबळ उडाली.

आत्महत्येची कारणे अद्याप अस्पष्ट-

भाईंदर स्थानकावरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारून या दोघांनी आपले जीवन संपवले. घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, वसई रेल्वे पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

सीसीटीव्ही फूटेजद्वारे माहिती-

घटनेचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध झाले असून, त्यात बाप-लेक स्थानकाच्या फलाटावरून चालत जाताना आणि समोरून येणाऱ्या लोकलखाली झोपताना दिसतात. व्हिडिओमध्ये वडील आणि मुलगा रेल्वेच्या रुळावर झोपलेले स्पष्ट दिसत आहे. अचानक धावत्या लोकलसमोर आल्यामुळे लोकल चालकाने थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो असफल ठरला आणि लोकल दोघांच्या अंगावरून गेली.

पुढील तपास सुरू

या प्रकरणी वसई पोलिसात नोंद झाली असून, पुढील तपास सुरू आहे. दोघांकडे सुसाइड नोटही आढळलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलिस अधिक तपशील शोधत आहेत, जेणेकरून आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : कोयता गँग पुन्हा सक्रिय, 12 वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT