railway isolation 
मुंबई

मुंबईतील चार स्थानकात रेल्वेडब्यांमध्ये विलगीकरण कक्ष 

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईतील चार प्रमुख रेल्वे स्थानकानजीक विलगीकरण कक्षाची व्यवस्था असलेल्या रेल्वेचे डबे सज्ज ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील 215 स्थानकांनजीक एकंदर विलगीकरण कक्षासाठी 5 हजार डबे तयार ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई सेंट्रल, दादर (पश्चिम), वांद्रे टर्मिनस तसेच पनवेल या मुंबईतील चार रेल्वे स्थानकांची यासाठी निवड करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढल्यास या डब्यांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. अर्थातच कोरोना झाल्यामुळे उपचार होत असलेल्या तसेच कोरोना झाल्याची शंका असलेल्यांना वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवण्यात येणार आहे. 

देशातील रेल्वे लॉकडाऊनमुळे बंद झाल्यापासूनच रेल्वेने या डब्यांचे रुपांतर विलगीकरण कक्षांत करण्यास सुरुवात केली होती. हे खास डबे पूर्णपणे स्वच्छ करुन तसेच निर्जंतुकीकरण करुनच राज्यांकडे सोपवण्यात येणार आहेत. अर्थातच हे डबे कोरोना रुग्णांवरील उपचारासाठीच असलेल्या रुग्णालयांशी संलग्न असतील. त्यामुळे रुग्णाची प्रकृती बिघडल्यास त्यांना त्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात येईल. 

रेल्वेच्या डब्यांतील रुग्णांसाठी रुग्णवाहिका राज्य सरकार उपलब्ध करुन देतील. तसेच त्यातील आरोग्य कर्मचारीही राज्य सरकारचेच असतील. रेल्वे मात्र डब्यातील पाणी तसेच विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करणार आहे. या रेल्वे डब्यांची व्यवस्थेसाठी रेल्वे खास अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. राज्य सरकार त्यांची मदत घेऊन आवश्यकतेनुसार रेल्वेचे डबे रुग्णांच्या संख्येनुसार उपलब्ध करुन देण्याची सूचना करु शकेल. या रुग्णांसाठी भोजन देण्याची व्यवस्था आयआरसीटीसी करणार आहे.  त्याची व्यवस्था सुरक्षा रेल्वे सुरक्षा दल करणार आहे. 

देशभरात 23 राज्यात एकंदर 5231 डबे कोरोना उपचारासाठी तयार आहेत. ही सुविधा प्रमुख शहरात असेल. त्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील पुणे, नागपूर शहरांचा समावेश असल्याचे समजते. राज्यातील एकंदर 21 स्थानकांचा समावेश रेल्वेच्या यादीत असल्याचे समजते. रेल्वे 85 स्थानकांवर ही आरोग्य सेवा देईल. त्याचबरोबर राज्याने कर्मचारी दिल्यास अन्य दिल्यास देशभरातील अन्य 135 स्थानकांवरही ही सुविधा देण्याची तयारी दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT