मुंबई

कोविडचा धसका! सुरक्षित संबंधांना मुंबईत प्राधान्य

गर्भपाताचे प्रमाण 59 टक्‍क्‍यांनी घटले

भाग्यश्री भुवड

मुंबई: कोविडमुळे मुंबईतील (Mumbai) नागरिकांची जीवनपध्दतीच (Lifestyle) बदलली असल्याचं वारंवार दिसत आहेत. ही जीवनपध्दती फक्त सार्वजनिक ठिकाणी नाही तर वैयक्तिक संबंधातही (Sex Life) बदलली आहे. कोविड काळात मुंबईतील गर्भपाताचे (Abortion) प्रमाण पूर्वीच्या वर्षांच्या तुलनेने तब्बल 59 टक्‍क्‍यांनी घटल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी सुरक्षित संबंधांना (Safe Sexual Relations) प्राधान्य दिल्यामुळे जन्मदराबरोबरच गर्भपाताचे प्रमाणही घटत असल्याचे चित्र आहे. (Fear of Covid Infection Couples in Mumbai giving preference to safe sex abortion rate also came down)

कोविड काळात मुंबईतील नागरिकांनी रुग्णालयात जाण्याचा धसकाच घेतला होता. त्यामुळे, कोविडच्या वर्षात गर्भधारणा टाळण्याकडे भर होता. महाराष्ट्र रजिस्ट्रर फार्मासिस्ट असोसिएशनने अध्यक्ष कैलास तांदळे यांनी दिलेल्या माहिती नुसार, कोविडच्या वर्षात पुर्वीच्या वर्षापेक्षा निरोधाच्या विक्रीत 30 ते 40 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. 2019-20 वर्षात मुंबईत 35 हजार 563 गर्भपात झाले होते. तर,कोविडच्या वर्षात 2020-21(मार्च पर्यंत) या काळात 20 हजार 912 गर्भपात झाले असल्याची माहिती महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे. तर,पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार, जन्मदर 2019 मध्ये 11.61 एकक होता तो 2020 मध्ये 9.33 वर आला आहे.

विवाहीत जोडप्यांमध्ये नको असलेली गर्भधारणा, गर्भातील व्यंग यामुळे गर्भपाताचे प्रमाण अधिक असते. मात्र, कोविड काळात अनावश्‍यक गर्भधारणा होऊ नये म्हणून जोडप्यांनी सुरक्षा साधनांचा वापर केला. यात निरोध बरोबरच महिलांच्या वापराच्या संतती नियोजनांच्या साधनांचाही वापर झाल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

25 वर्षावरील महिलांच्या गर्भपाताच्या प्रमाणात 61 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. 2019-20 मध्ये या वयोगटात 29 हजार 326 गर्भपात झाले होते. तर, 2020-21 या वर्षात 17 हजार 931 गर्भपात झाले आहे. तर, 24 वर्षापर्यंतच्या वयोगटात गर्भपाताचे प्रमाण 47 टक्‍क्‍यांनी घटले आहे. 2020-21 या वर्षात या वयोगटात 2981 गर्भपात झाले होते. तर, 2019-20 या वर्षात 6 हजार 237 गर्भपात नोंदवण्यात आले होते. 2019-20 या वर्षात 19 वर्षांपर्यंतच्या तरुणींचे 482 गर्भपात झाले होते.पण, 2020-21 या वर्षात फक्त हे प्रमाण 185 एवढे आहे.

  • नाॅन कोविड सुविधा नसल्याचा परिणाम-

कडक लाॅकडाउनमुळे नाॅन कोविड सुविधांचा अभाव होता. त्यामुळे, नागरिकांचा आरोग्य यंत्रणेवर ताण होता. शिवाय, कोविड संसर्गाची ही भीती होती. यातून गर्भपाताच्या संख्येत घट झाली आहे.

-डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, (आरोग्य) पालिका

  • कोविडची भीती-

कोविडच्या भीतीतून अनेक जोडप्यांनी गर्भधारणा टाळली. डाॅक्टर्स उपलब्ध न होणे, ओपीडी सुरू नसणे, शस्त्रक्रिया न होणे, मॅटर्निटी होम सुरू नसणे, कोविड संसर्ग अशी बरीच कारणे आहेत. शिवाय, गर्भधारणेनंतर घेतलेल्या काॅन्ट्राॅसेप्टीव्ह चा महिलेच्या शरीरावर विपरीत परिणाम होत नसल्याने महिलांना तोंडावाटे घेतल्या जाणार्या गर्भनिरोधक गोळ्यांना ही पसंती दिली आहे. एकूणच गर्भनिरोधक वस्तूंचा वापर वाढला आहे. पण, काॅन्ट्राॅसेप्टीव्हच्या गंभीर परिणामांपेक्षा फायदेच जास्त असतात. नको असलेली गर्भधारणा झालीच तर गर्भपात करता येणार नाही या भीतीने ही गर्भपाताचे प्रमाण कमी झाले आहे.

-डाॅ. अशोक आनंद, स्त्रीरोगतज्ज्ञ, जेजे रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT