Corona Vaccination sakal media
मुंबई

ठाणे जिल्ह्यातील ५४ गावे लसवंत; १०० टक्के नागरिकांची पहिली मात्रा पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे ग्रामीण (thane corona vaccination) भागातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी ५४ ग्रामपंचायतीतील १०० टक्के नागरिकांची पहिली मात्रा (First dose) पूर्ण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक गावे ही भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील आहेत. तर अंबरनाथ मधील अवघ्या एका गावात १०० टक्के लसीकरण झाले आहे. ठाणे ग्रामीण भागातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर (shahapur) तालुक्यांमधील १८ वर्षावरील नागरिकांची संख्या ११ लाख ३५ हजार १३२ इतकी आहे.

त्यापैकी आतापर्यंत ९ लाख १७ हजार ५२८ नागरिकांची पहिली मात्रा पूर्ण झाली असून यामध्ये ५ लाख ८८ हजार ८७५ नागरिकांनी लशीची दुसरी मात्राही घेतली आहे. लसीकरण मोहीमेच्या सुरुवातीला या भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी प्रचंड गैरसमज होते. त्यामुळे हे नागरिक लस घेण्यासाठी पुढाकार घेत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहीम समाज राबविण्यास सुरुवात झाली. तसेच शिक्षक, आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सेविकाही घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरणाविषयी माहिती देऊन त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करत होते.

त्यामुळे टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवरही नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. ग्रामीण भागात आतापर्यंत ८१ टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा तर, ५१ टक्के नागरिकांच्या लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. तसेच ५४ गावातील १८ वर्षावरील १०० टक्के नागरिकांची पहिली मात्रा पूर्ण झाली असून, यामध्ये सर्वाधिक गावे ही भिवंडी तालुक्यातील असल्याची माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

पहिली मात्रा पूर्ण झालेल्या गावांची संख्या

तालुका गावांची संख्या

कल्याण १७

मुरबाड ९

शहापुर ४

अंबरनाथ १

भिवंडी २३

एकूण ५४

तालुका निहाय लसीकरण टक्केवारी अहवाल

तालुका पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी

अंबरनाथ ६७ ४३

भिवंडी ८१ ५०

कल्याण ८३ ६२

मुरबाड ९० ५३

शहापूर ८२ ५३

एकूण ८१ ५२

दुर्गम पाड्यांचे आव्हान कायम

ग्रामीण भागातील काही दुर्गम पाड्यांमध्ये आजही काही नागरिक लस घेण्यासाठी उत्सूक नाहीत. मात्र, या नागरिकांचेही लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी त्या भागात फिरते लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तसेच काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्या गावांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार, त्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

- डॉ.. गंगाधर परगे , ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT