मुंबई

आई बाबांच्या आधी 'त्या' अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीने हरवलं कोरोनाला

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना नावाचं संकट जगात थैमान घालत आहे. महाराष्ट्रात कोरोग्रस्तांचा आकडा तब्बल १४७ वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे राज्यात सगळीकडे दहशत आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यात कोरोनामुळे जीव जातो अशा अफवा सोशल मीडियावरून पसरवल्या जात आहेत. मात्र कोरोनासारख्या भयंकर रोगावर एका ३ वर्षांच्या चिमुकलीने मात केली आहे.

कल्याणमध्ये ही ३ वर्षांची चिमुकली राहते. तिचे आणि तिच्या आई वडिलांची कोरोना टेस्ट करण्यात अली होती. या तिघांच्याही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागच्या १५ दिवसांपासून या चिमुकलीवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. आणि अखेर आई-वडिलांच्याही आधी या चिमुकलीनं कोरोनावर मात केली आहे.

या चिमुकलीचे वडील कंपनीच्या कामानमित्तानं UAE मध्ये गेले होते. जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असतानाच ते कंपनीच्या कामानिमित्तानं परदेशात अडकले होते. परदेशातून परत आल्यावर वडील आणि आई दोघांच्याही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना कस्तुरबामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर या ३ वर्षांच्या चिमुकलीच्याही काही टेस्ट करण्यात आल्या आणि तिला क्वारंटाइन कऱण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार सुरू होते. या उपचारानंतर पुन्हा एकदा चिमुकलीच्या टेस्ट करण्यात आल्या. मात्र या चाचण्यांमध्ये निगेटीव्ह रिपोर्ट आल्यामुळे ती कोरोनमुक्त झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तिला नातेवाईकांकडे सोपवण्यात आलं आहे. तिच्या आई-वडिलांवर अद्यापही कस्तुरबामध्ये उपचार सुरू आहेत.

अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकलीचा कोरोनाविरुद्धचा लढा बघून सर्वजण या चिमुकलीचं कौतुक करत आहेत. तर कोरोनामुळे जीव जातोच या अफवांवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आणि घाबरून जाणाऱ्यांसाठी ही चिमुकली एक प्रेरणा आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीलाही हरवता येऊ शकतं हे या चिमुकलीनं आज संपूर्ण देशाला दाखवून दिलं आहे.

fight against virus three years old child recovered from covid19 novel corona virus infection

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे अज्ञाताकडून संभाजीनगरमध्ये होर्डिंग

SCROLL FOR NEXT