रायगड पोलिसांसाठी अमेरिकन कंपनी धावली! 
मुंबई

रायगड पोलिसांसाठी अमेरिकन कंपनी धावली!

सकाळ वृत्तसेवा

रायगड : कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांना औषधोपचाराबरोबरच मानसिक सल्ल्याची गरज असल्याने रायगड पोलिसांनी टेलिमेडिसीन सेवेचा आधार घेतला आहे. आता या सेवेतून पोलिस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना घरबसल्या आरोग्य सल्ला घेता येणार आहे.

पोलिसांची हीच गरज लक्षात घेऊन विनामूल्य टेलिमेडिसीन समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. टेलिमेडिसीन समुपदेशन ही आजच्या काळातील लोकप्रिय अशी सुविधा आहे. ज्याद्वारे रुग्णांना कॉल अथवा व्हिडीओ कॉलिंगद्वारे डॉक्टरांशी थेट संवाद साधता येतो. फिगमॅड (FIGMD) प्रायव्हेट लिमिटेड ही अमेरिकेतील एक अग्रणी अशी संस्था आहे, जी रुग्णांना मोबाईल ॲपद्वारे अथवा हेल्पलाईन क्रमांकाद्वारे टेलिमेडिसीन समुपदेशन सुविधा पुरविते. ज्यात अमेरिकेतील तब्बल 60 टक्के डॉक्टर्स जोडले गेले आहेत. भारतातही त्यांच्यामार्फत तशी सुविधा सुरू करण्यात आली आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची प्राथमिक लक्षणे आढळल्यास रायगड पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेकरिता विनामूल्य टेलिमेडिसीन समुपदेशन सुविधा 24 तास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेअंतर्गत आरोग्य तपासणीसाठी हेल्पलाईन क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर 45 मिनिटांच्या आत एका समन्वयकाद्वारे संपर्क साधला जातो. ज्यात आपल्या सोईनुसार तपासणीची वेळ ठरविण्यात येईल. ठरविलेल्या वेळेनुसार कॉल अथवा व्हिडीओ कॉलिंगद्वारे डॉक्टर आपल्याशी संपर्क साधतात. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ठरलेल्या वेळेनुसार संबंधित आजारावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समुपदेशन केले जाते. हे पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाइकांना मोफत आहे.
- सचिन गुंजाळ, अपर पोलिस अधीक्षक, रायगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT