hotel quarantine 
मुंबई

विलगीकरणासाठी हाॅटेल न देणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलिगीकरणासाठी हॉटेल न देणा-या मालक व व्यवस्थापकाविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या सहाय्यक अभियंत्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेने मुंबईतील विविध हाॅटेल्स, सामुदायिक अथवा सार्वजनिक सभागृहे ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. तरीही काही हाॅटेल्स ताब्यात देण्यास विरोध होत आहे.

दादर पूर्व येथील रामी गेस्ट लाईन हॉटेलमध्ये 30 खोल्या आहेत. हे हाॅटेल पालिका एफ / उत्तर विभागाच्या ताब्यात घेण्याकरीता सहाय्यक आयुक्त गजानन विनायक बेल्लाळे यांनी आदेश दिले होते; मात्र हाॅटेलच्या व्यवस्थापनाने हॉटेलमधील खोल्यांचे दुरुस्तीचे काम चालू असल्याचे सांगत हाॅटेल ताब्यात देण्यास वारंवार टाळाटाळ केली. त्यामुळे पालिकेच्या सहाय्यक अभियंत्याने याप्रकरणी  माटुंगा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आपत्ती व्यवस्थाप अधिनियम 2005  व महाराष्ट्र कोविड-19 नियमन 2020 अंतर्गत हॉटेलचे मालक एस एस शेट्टी, व्यवस्थापक विनोद नायर  यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Filed a case against the owner who did not provide the hotel for quarantine

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT