exam 
मुंबई

अंतिम वर्षांच्याही परिक्षा रद्द करा; सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यातील विद्यापीठांच्या प्रथम वर्षाच्या आणि द्वितीय वर्षाच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येक दिवसागणिक वाढत असताना परिक्षेचा आग्रह कशाला, अशी विचारणा अनेक विद्यार्थी करत आहेत.

एकीकडे कोरोनाचे संकट वाढलेले असताना अंतिम वर्षांच्या परिक्षा का घेण्यात येत आहे, असा सवाल विचारत अनेक विद्यार्थ्यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी यावेळी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठ यासह आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांना हॅशटॅग केले आहे. आम्ही कुठे फिरायला जाण्यासाठी परिक्षा घेऊ नका असे म्हणत नाही. आमचाही सध्याच्या परिस्थितीत विचार करा, असे ट्विट यश शाहने केले आहे. तर कायराने मुंबई विद्यापीठातील पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ताण कमी केला आहे आमचे काय? जी काही सध्याची परिस्थिती आहे, त्यामुळे तणाव आहेच. त्या परिस्थितीत आम्ही प्रवास करावा आणि परिक्षा द्यावी ही अपेक्षा कशी करता? अशी विचारणा केली आहे. सर्वांचाच परिक्षेला विरोध नाही. जय सावला याने मुंबई विद्यापीठाने निर्णय घेताना त्याचे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतील याचा विचारच केला नाही असेच काही विद्यार्थी समजत आहेत. 

लॉकडाऊन कायम राहिल्यास किंवा कोरोनाची साथ कमी न झाल्यास मुंबई विद्यापीठांच्या परिक्षांचे काय होणार हा प्रश्न आहे. मुंबईतील साथ कमी होत नाही, तोपर्यंत सार्वजनिक वाहतूक सुरु होणार नाही, याकडे लक्ष वेधतात. मुंबई विद्यापीठाची परिक्षा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रातील विद्यार्थीच देत नाहीत, तर देशातील अनेक विद्यार्थी देतात. हे विद्यार्थी परिक्षेसाठी मुंबईत कसे येणार, मुंबई रेड झोनमध्ये आहे, या परिस्थितीत परिक्षेसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा धोका वाढणार नाही का? अशी विचारणा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rave Party Raid : पुण्यात कथित हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर मध्यरात्री छापा, रिसॉर्टमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update : बारामतीत कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांची हतबलता; ट्रकभर कांदा मेंढ्यांना चारा म्हणून

Pimpri: लग्न जमविण्याच्या नावाखाली घातला जातोय गंडा; विवाहेच्छूंनो सावधान; बनावट प्रोफाइलद्वारे फसवणुकीचे वाढते प्रकार

Obesity Crisis in Maharashtra: महाराष्ट्रात स्थूलतेचा झपाट्याने वाढता धोका; १० पैकी ४ महिला जादा वजनाच्या, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा इशारा

Pune: पाच हजार नागरिकांचे घराचे स्वप्न प्रतीक्षेत; दहा हजारांपेक्षा जास्त अर्ज; घरांची संख्या मर्यादितच

SCROLL FOR NEXT