budget  sakal media
मुंबई

पालघर जिल्ह्यातील दोन तालुक्यांना अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद

प्रसाद जोशी

वसई : यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू व तलासरी या तालुक्यांसाठी १९४ कोटी ६२ लाखांची भरीव आर्थिक तरतूद (Financial Provision) केली आहे. या निधीतून शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरिता आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहाचा विकास व अन्य कामे केली जाणार आहेत. तसेच नगर परिषद व नगर पंचायतीमधील ग्रामीण भागातील विकास कामांना (Development work) गती दिली जाणार आहे.

डहाणू विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आदिवासी क्षेत्र आहे. या ठिकाणी सर्वांगीण विकास करता यावा व येथील भागाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करता यावे याकरिता आमदार विनोद निकोले प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे अर्थसंकल्पात डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील आदिवासी आश्रम शाळा वसतिगृह सुधारणे, नवीन प्रशासकीय इमारत उभारणे व रस्ते, पूल, राजमार्ग दुरुस्ती, वाहतूक व्यवस्था सुधारणा आदींसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. येत्या दोन तालुक्यांची येत्या दोन वर्षांत कामे मार्गी लागणार आहेत.

आश्रमशाळा दुरुस्ती चार कोटी ११ लाख तसेच वसतिगृह व आश्रमशाळेत शिक्षणाच्या प्रसारासाठी सहा कोटी ५९ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्ग या रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता सात कोटी ६० लाख, दोन्ही तालुक्यांतील रस्तेदुरुस्तीसाठी ७६ लाख, रस्ते, पूल निर्मितीकरिता १६४ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले असून १९४ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

डहाणू नगरपरिषद व तलासरी नगरपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती विकास योजनेंतर्गत निधी, आदिवासी विकास विभागाचा निधी, असे शासकीय योजना व निधीसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता यावे याकरिता प्रयत्न करणार आहे.

- कॉ. विनोद निकोले, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT