वसई ः दिव्यामुळे सदनिकेला लागलेली आग.  
मुंबई

जळत्या दिव्याने केला घात

सकाळ वृत्तसेवा

वसई ः घरात पूजाअर्चा करताना लावण्यात आलेल्या दिव्यामुळे आग लागल्याची घटना वसई पश्‍चिमेतील इमारतीत घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्‍यात आणली; मात्र या घटनेमुळे इमारतीच्या राहिवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली. 

वसई पश्‍चिमेतील साठ फूट मार्गावर समीर नावाची इमारत आहे. यातील तळमजल्यावरील सी- 8 मध्ये हसमुख परमार व त्यांच्या पत्नी भारती राहतात. गुरुवारी (ता.6) दुपारी बाराच्या सुमारास भारती यांनी घरी पूजा करताना दिवा लावला आणि दरवाजा बंद करून शेजारच्या घरी जाऊन बसल्या. याचदरम्यान घराला आग लागली.

याची माहिती त्वरित इमारतीचे सचिव महेंद्र केनिया यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर 6 जवान आणि 2 पाण्याचे बंब घटनास्थळी आले. रहिवाशांना इमारतीबाहेर काढण्यात आले. नंतर आग विझवण्यात आली. घरातील सर्व वस्तू आगीच्या विळख्यात सापडून भस्मसात झाल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रहिवासी प्रचंड घाबरले होते. आगीत मालमत्तेचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : अमरावतीमधील बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण, तरीही लोकार्पण रखडले

Solapur: आषाढीसाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद, मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’; स्वच्छता, आरोग्य, वाहतूक सुविधांवर भर

Vat Purnima : आज वटपौर्णिमा; सकाळी ६ ते १०.३० हा पूजेसाठी उत्तम कालावधी, दुपारी १२.०८ ते १२.५९ या वेळेतही करता येईल पूजा; भद्रा काळ वर्ज्य नाही

SCROLL FOR NEXT