मुंबई

मोठी बातमी - मुंबईतील प्लाझ्मा थेरेपी केलेल्या 'त्या' रुग्णाने अखेर मिटले डोळे...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यात आला. नाशिकमध्ये असताना स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील पार पडलेली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाल्याची माहिती दिली होती. ५२ वर्षीय रुग्णावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात शनिवारी प्लाझ्मा थेरेपी पार पडली होती. दरम्यान दुर्दैवी बाब म्हणजे त्या रुग्णाचा आज मुत्यू झालाय.  

२ मे पासून रुग्णालयांना लागू होणार 'हे' नवीन नियम, सरकारने घेतलेत 'मोठे' निर्णय...
  
फुफ्सांचा संसर्ग, सर्दी ताप अशी लक्षणं असणाऱ्या ५२ वर्षीय व्यक्तीला लिलावातीमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. केंद्राने परवानगी दिल्यानंतर नायर हॉस्पिटलमध्ये बरा झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्मा लिलावातीमधील या व्याक्तीला देण्यात आलेल्या. कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीचे उपचार करण्यात येत होता. मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. दुर्दैवी बाद म्हणजे आज या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला. 

प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय? 

कोरोना रुग्ण बरा झाला की त्या रुग्णाच्या शरीरात व्हायरस सोबत लढणाऱ्या अँटीबॉडी तयार होतात. या अँटीबॉडी रक्तात असतात. ते रक्त काढून त्यातील प्लाझ्मा वेगळा केला जातो. अनेक देशामध्ये याचे प्रयोग सुरु आहेत. इबोला नियंत्रणात आणण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी अत्यंत उपयुक्त ठरली होती. दिल्लीत पहिला प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईत हा प्रयोग करण्यात आला.

दरम्यान आपण केंद्र सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतोय, नियमानुसार आपण प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करीत असल्याने आपल्याला काही अडचण येणार नाही. इतर राज्याचे माहीत नाही मात्र राज्यात आपण हा प्रयोग करणार असं आरोग्य मंत्री राजेश टोपे याआधीच म्हणालेत. 

first covid19 plasma therapy patient passed away in lilawati hospital mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT